शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर कार्यकारिणी बैठक : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध

By admin | Updated: April 11, 2015 01:40 IST

सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी बैठकीत प्रदेश कमिटीकडून आलेला पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी बैठकीत प्रदेश कमिटीकडून आलेला पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी सायंकाळी काँग्रेस भवन येथे झाली. बैठकीत केशव इंगळे यांनी क्रियाशील सदस्यांची मुदत संपल्याने प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आलेला पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. क्रियाशील सदस्य ऑनलाइन नोंदणी: 15 मे पर्यंत, बूथ प्रतिनिधी: 28 जुलैपर्यंत, ब्लॉक कमिटी: 20 ते 31 ऑगस्ट, शहर काँग्रेस पदाधिकारी: 1 ते 15 सप्टेंबर.
बैठकीच्या सुरुवातीला शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी प्रास्ताविकात बर्‍याच दिवसांनी कार्यकारिणीची बैठक होत असून, लवकरच दोन दिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सुधीर खरटमल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती उत्सव समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदे यांची निवड झाल्याबद्दल व आ. प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया सेलवर निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर दोघांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी धर्मा भोसले यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री गिरीराज यांच्या, माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी भूमी अधिग्रहण कायदा करून सामान्य शेतकर्‍यांचे हित हिरावून घेणार्‍या मोदी सरकारच्या निषेधाचे ठराव मांडले. मुस्लिमांचे आरक्षण रद्द केल्याबद्दल आसिफ नदाफ यांनी तर आश्वासन देऊनही धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश न करणार्‍या फडणवीस सरकारच्या निषेधाचा ठराव महेश गडदे यांनी मांडला. बैठकीला काँग्रेसच्या नेत्या उज्‍जवला शिंदे, महापौर सुशीला आबुटे, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, ज्योती वाघमारे, माजी खासदार धर्मण्णा सादूल, नलिनी चंदेले, अलका राठोड, मनोज यलगुलवार, अशोक लांबतुरे, देवेंद्र भंडारे, राजन कामत, अजय दासरी, अंबादास गुत्तीकोंडा, चंद्रकांत कोंडगुळे, मनीष गडदे, किसन मेकाले, राहुल गायकवाड, अशोक कलशे?ी, हणमंतू सायबोळू, अमोल शिंदे, चेतन नरोटे, आरिफ शेख, जयकुमार माने, शिवलिंग कांबळे, जगदेवी नवले, फिरदोस पटेल आदी उपस्थित होते.
इन्फो..
महापौरांचे अभिनंदन
लोकांच्या भावना लक्षात घेऊन महापौर सुशीला आबुटे यांनी महापौर चषक स्पर्धा पुढे ढकलल्याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्याने लोकहिताची कामे करा, असा सल्ला त्यांनी दिला.