शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी यांची खासदारांविषयी नाराजी

By admin | Updated: March 22, 2017 00:35 IST

पंतप्रधान मोदींनी संसदेत भाजपा सदस्य गैरहजार राहात असल्याबद्दल कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. मंगळवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीपंतप्रधान मोदींनी संसदेत भाजपा सदस्य गैरहजार राहात असल्याबद्दल कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. मंगळवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला अनेक मंत्री उपस्थित नव्हते. सभापती हमीद अन्सारींनी त्याबाबत खेद व्यक्त केला होता आणि दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला चिमटे काढले. पंतप्रधानांनी याची गांभीर्याने दखल घेतली.गेले दोन दिवस दोन्ही सभागृहांत सत्ताधारी बाके रिकामी होती. दोन्ही ठिकाणी अनेकदा कोरमही नव्हता. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी बैठकीत याचा उल्लेख करताच, करड्या शब्दांत सदस्यांची हजेरी घेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कामकाज सुरू असताना भाजपाचे जे सदस्य सभागृहाऐवजी, लॉबीत अथवा अन्यत्र हिंडतात, त्यांची संसदेतील उपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही. कोणत्याही सदस्याला मी अचानक फोन करून बोलावून घेईन. आपल्या अनुपस्थितीचा त्याला खुलासा करावा लागेल. परदेशात असतानाही मी अधिकाऱ्यांमार्फत सदस्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवणार आहे. ते म्हणाले, संसदेत विधेयक मांडणे, कायदा तयार करण्यासाठी मतदानाला उपस्थित राहणे, एवढ्याने खासदारांची जबाबदारी संपत नाही. विषय केवळ उपस्थितीपुरता मर्यादित नाही. रा. स्व.संघाच्या पदाधिकाऱ्याचे एक विधान उधृत करीत पंतप्रधान म्हणाले, स्वयंसेवकांना उद्देशून संघाचे पदाधिकारी म्हणायचे, स्वयंसेवकांना खूप काम आहे, फक्त संघाच्या शाखेत हजर राहायला वेळ नाही. त्याच धर्तीवर खासदारांना खूप काम आहे. फक्त संसदेच्या कामकाजात भाग घ्यायला वेळ नाही, असे मी समजेन. मात्र, असे चालणार नाही. मोदी सरकारला २६ मे रोजी तीन वर्षे पूर्ण होतील. त्या निमित्ताने भाजपातर्फे देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. संसदेत आपण काय केले, कोणते कायदे मंजूर केले, कोणत्या योजना राबवल्या, याचे तपशील जनतेला समजावून सांगण्याची जबाबदारी संसद सदस्यांवर आहे, असे सांगून, सभागृहात अनुपस्थित राहाणारे सदस्य ती कशी पार पाडणार? असा सवालही मोदी यांनी केला.