जंगलात लपलेले दहशतवादी ड्रोनद्वारे दिसले, आता जवान अंतिम हल्ला करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 08:35 AM2023-09-16T08:35:06+5:302023-09-16T08:36:30+5:30

लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करत असताना, शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कराचा आणखी एक जवान शहीद झाला.

anantnag gadol kokernag encounter latest updates in jammu kashmir | जंगलात लपलेले दहशतवादी ड्रोनद्वारे दिसले, आता जवान अंतिम हल्ला करण्याच्या तयारीत

जंगलात लपलेले दहशतवादी ड्रोनद्वारे दिसले, आता जवान अंतिम हल्ला करण्याच्या तयारीत

googlenewsNext

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. गडोल कोकरनाग परिसरात सुरू असलेल्या कारवाईच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सुरक्षा दल चांगलेच आक्रमक दिसले. यावेळी ड्रोनद्वारे केलेल्या कोम्बिंगदरम्यान एक दहशतवादी जंगलात पळताना दिसला. तसेच, सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे ठिकाण सापडल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, सुरक्षा दलांनानी गडोलच्या जंगलात दहशतवाद्यांची लपलेली अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्या डोंगराळ भागात छोट्या नैसर्गिक गुहा असल्याने सैनिकांना कारवाईत वेळ लागत आहे. प्रत्येक गुहेत दहशतवादी लपलेले असू शकतात, त्यामुळे सुरक्षा दल सावधपणे पुढे जात आहे.

लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करत असताना, शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कराचा आणखी एक जवान शहीद झाला. त्यामुळे या कारवाईत शहीद झालेल्या जवानांची संख्या चार झाली आहे. एका वरिष्ठ पोलीस सुत्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी झालेल्या गोळीबारात जवान जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी सुरक्षा दलांची कारवाई खूपच आक्रमक दिसून आली. लष्कराच्या जवानांनी जंगलातील दहशतवाद्यांच्या संभाव्य ठिकठिकाणी शेकडो स्फोट घडवून चार नैसर्गिक गुहा उद्ध्वस्त केल्या. दहशतवाद्यांनी त्या गुहांचा वापर जंगलात लपण्यासाठी करत होते.

शुक्रवारी केलेल्या ऑपरेशनमध्ये रणनीतीने कोम्बिंग करण्यात आले. कमांड सेंटरही घटनास्थळी आणण्यात आले. यासोबतच हेलिकॉप्टर आणि क्वाडकॉप्टरद्वारेही लक्ष्य निश्चित करण्यात आले. यानंतर स्पेशल फोर्सने बॉम्बफेक करून त्या लक्ष्यांना उद्ध्वस्त केले. गेल्या 3 दिवसात आतापर्यंत सहा गुहा उद्ध्वस्त झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी जवानांनी शुक्रवारी आधुनिक शस्त्रांचा वापर केला. यामध्ये UBGL,ग्रेनेड लाँचर आणि आयईडी स्फोट करण्यात आले. तसेच, मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचीही मदत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले असून त्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. 

अनंतनागच्या कोकरनागमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मंगळवारपासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे. बुधवारी सुरक्षा दलाचे अधिकारी दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. यादरम्यान लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना गोळ्या लागल्या. जखमी अधिकाऱ्यांना तातडीने हेलिकॉप्टरने विमानाने हलवण्यात आले, मात्र या अधिकाऱ्यांना वाचवता आले नाही. तसेच, बुधवारी जखमी झालेल्या एका जवानाचाही गुरुवारी मृत्यू झाला. 

या दहशतवादी घटनेची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची दहशतवादी संघटना असलेल्या टीआरएफने घेतली आहे. या हल्ल्यात १० लाख रुपयांचे इनाम असलेला दहशतवादी उझैरचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी सुरक्षा दल चांगलेच आक्रमक झाले आहे. कोकरनागच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांनी तळ ठोकला आहे. ऑपरेशनमध्ये रणनीतीने कोम्बिंग करण्यात येत आहे. सुरक्षा दलांनानी गडोलच्या जंगलात दहशतवाद्यांची लपलेली अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.

Web Title: anantnag gadol kokernag encounter latest updates in jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.