शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:10 IST

Amit Shah on Rahul Gandhi : "मी शब्द देतो, जोपर्यंत संसदेत भाजपचा एकही खासदार आहे, तोपर्यंत आरक्षण संपणार नाही."

Amit Shah on Rahul Gandhi : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रेवाडी येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. "काँग्रेस नेत्यांनी अग्निवीर योजनेबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. आज देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, जम्मू-काश्मीर सुरक्षित आहे, यात हरियाणाच्या सैनिकांचे त्याग आणि शौर्य सामील आहे," असे अमित शाह म्हणाले.

काँग्रेसने एमएसपीवर खोटे बोलणे बंद करावेशाह पुढे म्हणतात, "हरियाणात काँग्रेसची सत्ता असताना कट, कमिशन आणि भ्रष्टाचारावर भर असायचा. व्यापारी, दलाल आणि जावयाचे राज्य होते. पण, भाजप सरकारमध्ये ना डीलर उरले ना दलाल, जावयाचा प्रश्नच नाही. राहुल गांधींना कुणीतरी सांगितले की, एमएसपीच्या मुद्द्यावरुन मते मिळतात. पण, मूळात राहुल यांना एमएसपीचा फुल फॉर्म माहितेय का? खरीप आणि रब्बी पिके कोणती असतात, त्यातील फरक तरी त्यांना माहीतेय का?" 

"देशभरात सुरू असलेली काँग्रेसची सरकारे एमएसपीच्या नावाखाली शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहेत. हरियाणातील भाजप सरकार एमएसपीवर शेतकऱ्यांकडून 24 पिके खरेदी करत आहे. हरियाणातील काँग्रेस नेत्यांनी एकदा सांगावे की, तुमचे देशातील कोणते सरकार 24 पीक एमएसपीवर खरेदी करते?" असा सवालही अमित शाह यांनी राहुल गांधींना यावेळी केला.

अमेरिकेतील वक्तव्यावर टीकापरदेशी भूमीवर केलेल्या वक्तव्यावरुन शाहांनी राहुल गांधींना धारेवर धरले. "राहुल परदेशात जाऊन एसटी-एससी-ओबीसी समाजाचे आरक्षण संपवू, असे सांगतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते आमच्यावर आरोप करायचे की, आम्ही आरक्षण संपवणार आहोत, पण आता ते स्वतः अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात. राहुलबाबा, तुम्ही आरक्षण कसे संपवाल? सरकार आमचे आहे. मी शब्द देतो की, जोपर्यंत संसदेत भाजपचा एकही खासदार आहे, तोपर्यंत तुम्ही आरक्षण संपवू शकत नाही," असा इशाराही शाहांनी यावेळी दिला.

वन रँक वन पेन्शनवर काँग्रेसने दिशाभूल केली"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये हरियाणामधून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली, तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते की, आम्ही लष्करातील जवानांची वन रँक-वन पेन्शनची मागणी पूर्ण करू. आपल्या लष्कराचे जवान 40 वर्षांपासून ही मागणी करत होते. काँग्रेस 40 वर्षे वन रँक वन पेन्शन लागू करू शकली नाही, hC मोदींनी वन रँक वन पेन्शन लागू केली," असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा