रायबरेलीमध्ये वंशवाद पाहिला, विकास नाही- अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 17:51 IST2018-04-21T17:51:50+5:302018-04-21T17:51:50+5:30
काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीमध्ये अमित शहा यांनी शनिवारी रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर सडकून टीका केली.

रायबरेलीमध्ये वंशवाद पाहिला, विकास नाही- अमित शहा
रायबरेली- काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीमध्ये अमित शहा यांनी शनिवारी रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर सडकून टीका केली. 'या जिल्ह्यात फक्त परिवारवाद पाहिला आहे. पण विकास पाहिला नाही', अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. काँग्रेसच्या 'भगवा आतंकवाद'सारख्या टीकेलाही अमित शहा यांनी उत्तर दिलं. काँग्रेसच्या मक्का मशिद प्रकरणी तुम्ही केल्या कामावर पाणी फेरलं आहे. त्यामुळे तुम्हाला लोकांची माफी मागायला हवी, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.
वोटबँक मजबूत करण्यासाठी काँग्रेसने हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचं काम केलं आहे, असंही ते म्हणाले. 'काँग्रेसला हिंदू दहशतवादाचं खोटं पसरविण्यासाठी माफी मागायला हवी की नाही? असंही अमित शहा यांनी त्यांच्या शैलीत विचारलं. 4 दिवस उलटूनही वोटबँकेच्या राजकारणासाठी ते माफी मागत नाहीत, असं अमित शहा यांनी म्हटलं.
रायबरेलीला परिवारवादपासून मुक्त करू. या अभियानाची आजपासून सुरूवात करणार आहोत,असं म्हणत अमित शहा यांनी सोनिया गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली.