शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट ! 'गॅलॅक्सी नोट 7' वापरत असाल तर सावधान

By admin | Updated: October 11, 2016 10:13 IST

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने 'सॅमसंग गॅलेक्सी नोट 7' चे प्रोडक्शन थांबवले आहे. तसेच ग्राहकांना हा स्मार्टफोन न वापरण्याची सूचना दिली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने 'सॅमसंग गॅलॅक्सी नोट 7' चे प्रोडक्शन थांबवले आहे. तसेच ग्राहकांना हा स्मार्टफोन न वापरण्याची सूचना दिली आहे. अमेरिकेमध्ये विमान प्रवासादरम्यान एका ग्राहकाच्या सॅमसंग नोट 7 फोनला अचानक आग लागल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कंपनीने 'सॅमसंग गॅलॅक्सी नोट 7' धारकांना तात्काळ फोन स्विच्ड ऑफ करायला सांगितले असून फोन न वापरण्याची सूचना दिली आहे. फोनला अचानक आग लागणे, फोनचा स्फोट होणे, आणि बॅटरी तापणे या कारणांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
 
सॅमसंग नोट 7मधील बॅटरीच्या समस्येमुळे कंपनीने  2.5 मिलियन हँडसेट परत मागवून घेतले आहेत, फोनची निर्यातदेखील रोखली आहे, तसेच विक्रेत्यांनी फोनची विक्रीही थांबवायला सांगितले आहे. स्मार्टफोनमधील बॅटरीसंबंधी समस्येमुळे कंपनीला दोन महिन्यात दुस-यांदा फोनची विक्री थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
 
याआधी फोन अधिक प्रमाणात तापत असल्याची तक्रार दक्षिण कोरियातून नोंदवण्यात आली होती.  दक्षिण कोरियातून नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनंतर कंपनीने तातडीने ग्राहकांना जुना नोट 7 घ्यावा किंवा फोन बदलून घ्यायला सांगितले होते, मात्र तरीही फोनमधील समस्या कायम होत्या. अखेर, कंपनीने याचे प्रोडक्शन थांबवले.  दरम्यान, भारतामध्ये हा फोन अजूनही मार्केटमध्ये आलेला नाही. 
 
अॅपलच्या नव्या आयफोनसोबत स्पर्धा करण्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये हा फोन मार्केटमध्ये लाँच करण्यात आला होता, मात्र या घटनांमुळे, स्मार्टफोनमध्ये जागतिक पातळीवर टॉपवर असलेल्या या ब्रँडला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, फोनमध्ये नेमक्या काय समस्या निर्माण झाल्या आहेत, फोनच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम शोधून काढला पाहिजे, नाहीतर याचा फटका मार्केटमध्ये येणा-या गॅलेक्सी 8 वर देखील बसू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.