शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:15 IST

या अपघाताची माहिती मिळताच पिंकू मोदी यांचं कुटुंब अहमदाबादला रवाना झाले आहे.

अहमदाबाद - गुरुवारी सकाळी गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात उदयपूर येथील चौघे प्रवासी होते. त्यात उदयपूर येथील मार्बल व्यावसायिक पिंकू मोदी यांचा २४ वर्षीय मुलगा शुभ आणि २२ वर्षीय मुलगी शगुन मोदी प्रवास करत होते. त्याशिवाय रुंडेडा गावातील चंद मेनारिया आणि प्रकाश मेनारिया हेदेखील अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघाताची माहिती मिळताच पिंकू मोदी यांचं कुटुंब अहमदाबादला रवाना झाले आहे.

कोण आहे शुभ मोदी आणि शगुन मोदी?

शुभ मोदी आणि शगुन मोदी हे दोघेही उदयपूर मार्बल व्यावसायिक पिंकू मोदी यांची मुले आहेत. या दोन्ही भाऊ बहिणीने त्यांचे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वडिलांच्या व्यवसायात ते मदत करत होते. माहितीनुसार, दोघे भाऊ बहीण फिरण्यासाठी लंडनला जात होते. जिथे ते एका मित्राच्या घरी थांबणार होते. मात्र दुर्देवाने या विमान अपघातात पिंकू मोदी यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. शुभ आणि शगुन यांचे नाव प्रवासी यादीत ९८, ९९ या सीट क्रमांकावर दाखवले आहे. 

मेनारिया कुटुंबातील लोकही विमानात होते

याच दुर्घटनाग्रस्त फ्लाईटमध्ये उदयपूर जिल्ह्यातील रुंडेडा गावातील चंद मेनारिया आणि प्रकाश मेनारिया प्रवास करत होते. हे दोघे लंडनमध्ये शेफ म्हणून काम करत होते. कामावर परतण्यासाठी आज ते अहमदाबादहून लंडनला जात होते. त्यांचाही अपघात मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 

"कुणाच्याही वाचण्याची शक्यता कमी"

दरम्यान, ही दुर्घटना इतकी भयंकर आहे की या अपघातातून कुणीही वाचण्याची शक्यता फार कमी आहे. काही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांचे वाचणे कठीण आहे. सध्या घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ढिगारा हटवण्याचे काम आणि आगीवर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक असल्याचे अहमदाबाद पोलीस आयु्क्त जी.एस मलिक यांनी सांगितले. 

  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात