शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:53 IST

Air India Plane Crash Death: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात मोठी जीवित हानी झाली आहे. हे विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत घुसल्याने काही विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे. 

Air India Plane Crash News: प्रवासासाठी सुरक्षित म्हणून ओळखले जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाईनर विमानच कोसळले. गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून) दुपारी ही घटना घडली. या घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या ठिकाणांहून आतापर्यंत १०० मृतदेह मिळाले आहेत. तर वसतिगृहातील सहा विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर मेघानीनगर भागात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावरच हे विमान कोसळले. यात विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

मृतदेह बाहेर काढताना अडचणी 

विमान खाली कोसळले आणि वेगात इमारतीला जाऊ धडकले. त्यानंतर एक मोठा स्फोट झाला. घटनेनंतर विमान आगीच्या गोळ्यासारखेच झाले होते. आग इतकी भडकी होती इतका होता की, अनेक जण होरपळले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून १०० पेक्षा अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

वाचा >>विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना

विमानाच्या सांगड्यात माणसांचे मृतदेह होरपळल्याने अडकले. त्यामुळे ते बाहेर काढण्यास प्रचंड अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. सध्या युद्ध पातळीवर या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू आहे. काही मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसले. 

हातगाड्यांनी मृतदेह आणले रुग्णालयात

अचानक इतकी मोठी घटना घडल्यानंतर अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात स्ट्रेचरचा तुटवडा निर्माण झाला आहे. हातगाड्यांच्या मदतीने काही मृतदेह रुग्णवाहिका आणि रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. 

वसतिगृहाच्या चार इमारतींना धडकले विमान, ६ जणांचे मृतदेह मिळाले

एअर इंडियाचे विमान अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या वसतिगृहाला धडकले. तब्बल चार इमारतींना हे विमान धडकले. या वसतिगृहात निवासी डॉक्टर राहत होते.

ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी ५० ते ६० विद्यार्थी डॉक्टर वसतिगृहात होते. यातील बहुतांश वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवण करत होते. ६ विद्यार्थी डॉक्टरांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या घटनेत काही जणांच्या मृतदेहांचे तुकडे झाल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानahmedabadअहमदाबादGujaratगुजरात