शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:41 IST

अहमदाबाद विमानतळावरील रनवे २३ वरून १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला Mayday कॉल दिला होता

अहमदाबाद एअरपोर्टहून टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत एअर इंडियाचं विमान खाली कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते. त्यात २ पायलटसह १० केबिन क्रू मेंबर होते. हे विमान नेमके क्रॅश कसे झाला हा प्रश्न अनेकांना पडला आहे परंतु अद्याप अधिकृतपणे याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. परंतु एव्हिएशन एक्सपोर्ट यांनी क्रॅश होण्याचा काही अंदाज लावला आहे. त्यामुळे हे विमान क्रॅश होण्यामागे काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊया. 

एव्हिएशन एक्सपर्ट वंदना सिंह यांनी म्हटलं की, जेव्हा कधीही प्लेन टेकऑफ घेते तेव्हा ते जास्तीत जास्त इंधनासह उड्डाण घेते. अहमदाबाद विमान दुर्घटनेचं ठोस कारण आता सांगता येत नाही, त्याची माहिती फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून मिळेल. परंतु टेकऑफ घेतल्यानंतर विमान क्रॅश होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण लोड फॅक्टर असू शकते. लोड फॅक्टर मिस कॅल्क्युलेशनमुळे बऱ्याचदा प्लेन क्रॅश होण्याची शक्यता असते. लोड फॅक्टर हा कुठल्याही विमानात ठेवलेल्या वजनाचा योग्य अंदाज असतो. ज्यावर विमान संतुलित राहते. हे विमानात मागे-पुढे प्रवाशांना बसवून फिक्स केले जाते जेणेकरून प्रेशर कंट्रोल केले जाऊ शकते हे पहिले कारण त्यांनी सांगितले.

त्याशिवाय दुसरं कारण म्हणजे, विमानाचा लँडिंग गिअर पूर्णपणे बंद झाला नसावा. लँडिंग गिअर हा फ्लाईटचा असा भाग असतो, जो उड्डाण घेताना आणि उतरताना रनवेच्या संपर्कात येताच पूर्ण वजन सांभाळणे आणि काइनेटिक एनर्जी घेण्यासाठी डिझाईन केलेला असतो. हा तोच गिअर असतो ज्यातून प्लेनची चाके बाहेर येतात आणि रनवेवर प्लेन चालते असं एव्हिएशन एक्सपर्ट वंदना सिंह यांनी म्हटलं.

MAYDAY कॉल दिला अन्....

दरम्यान, अहमदाबाद विमानतळावरील रनवे २३ वरून १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला Mayday कॉल दिला होता. मात्र त्यानंतर विमानाकडून एटीसीला कुठलाही सिग्नल मिळाला नाही. तसेच काही क्षणांतच हे विमान खाली कोसळून आगीचे लोळ आकाशाकडे झेपावताना दिसले. विमानामध्ये काही गंभीर परिस्थिती किंवा समस्या निर्माण होऊन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर वैमानिकांकडून हा कॉल दिला जातो.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात