शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:30 IST

Ahmedabad Plane Crash : अपघातानंतर लगेचच खूप मोठा गोंधळ उडला. विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबीय रुग्णालयात धावत आले. 

अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे विमान काही मिनिटांत कोसळलं. बोईंग ७८७-८ विमानाने अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १:३८ वाजता लंडनमधील गॅटविक विमानतळासाठी उड्डाण केलं परंतु ५ मिनिटांतच ते अपघातग्रस्त झालं आणि एका निवासी भागात पडलं. विमानात २४२ लोक होते. 

अपघातानंतर लगेचच खूप मोठा गोंधळ उडाला. विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबीय रुग्णालयात धावत आले.  गुजरातच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले पूनम पटेल म्हणाले की, "माझी वहिनी लंडनला जात होती. एका तासातच मला विमान अपघात झाल्याची बातमी समजली. म्हणूनच मी येथे आलो आहे. तिला बघायलाही अजून मिळालेलं नाही. त्यामुळे काही समजत नाही."

भावना पटेल यांनी "माझी बहीण लंडनला जात होती. तिची फ्लाईट दुपारी १.१० वाजता होती. याच फ्लाईटचा अपघात झाला." तसेच "माझा मुलगा लंच ब्रेक दरम्यान हॉस्टेलमध्ये गेला होता. तेव्हाच तिथे विमान कोसळलं. माझा मुलगा सुरक्षित आहे आणि मी त्याच्याशी बोललो आहे. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे त्याला  दुखापत झाली आहे" असं  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या रमिला यांनी सांगितलं. 

एअर इंडिया विमान अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. "अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने धक्का बसला असून दुःखी आहे. हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकाबरोबर माझ्या संवेदना आहेत. बाधितांना मदत करण्यासाठी काम करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. 

एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले

२४२ प्रवाशांना लंडनला घेऊन जाणारे विमानअहमदाबाद विमानतळाबाहेरील परिसरात असलेल्या डॉक्टरांसाठीच्या हॉस्टेलवर कोसळले आहे. यामुळे हॉस्टेल परिसरातील वाहने जळून खाक झाली असून हॉस्टेलमधील विश्रांती घेत असलेले डॉक्टर, कर्मचारी यांच्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात