शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:07 IST

Astrologer Plane Crash Prediction: ही भविष्यवाणी आधी गेल्या वर्षी करण्यात आली होती. २९ डिसेंबर २०२४ रोजी २०२५ साठीची भविष्यवाणी करण्यात आली होती.

Plane Crash Prediction: एअर इंडियाच्याविमान अपघाताने अवघा देश हळहळला आहे. या अपघातात आतापर्यंत १०० हून अधिक प्रवाशांचे मृतदेह सापडले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अहमदाबादविमानतळावरून २३० प्रवाशांसह लंडनसाठी उड्डाण करणाऱ्या विमानाला तीन मिनिटांतच अपघात झाला. इंजिन बंद पडल्याने पायलटने पुन्हा विमान माघारी वळविले परंतू कमी उंची असल्याने त्याला वाचविता आले नाही. या अपघाताची भविष्यवाणी आता व्हायरल होऊ लागली आहे. 

मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त

एक्सवर अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठा (Astro Sharmistha) नावाच्या हँडलवरून ही भविष्यवाणी आधी गेल्या वर्षी करण्यात आली होती. २९ डिसेंबर २०२४ रोजी २०२५ साठीची भविष्यवाणी करण्यात आली होती. त्यात तिने भारतीय हवाई क्षेत्राबाबतही भविष्यवाणी केली होती. यात एका मोठ्या विमान अपघाताची शक्यता असल्याचे म्हटले होते. तिच पोस्ट तिने पुन्हा ५ जूनला रिपोस्ट करत मी आजही विमान अपघाताची शक्यता असल्याचे सांगत असल्याचे म्हटले होते. 

यानंतर अवघ्या सात दिवसांनी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आहे. शर्मिष्ठाने गेल्यावर्षी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, २०२५ मध्ये विमान वाहतूक क्षेत्र चांगले काम करेल, तसेच विमान अपघातांच्या बातम्या आपल्याला धक्का देऊ शकतात, असे भाकीत दोन महिन्यांपूर्वी केले होते. विमान वाहतूक क्षेत्रात थोडी सुधारणा आधीच सुरू झाली आहे. जेव्हा गुरु ग्रह मृगशिरा आणि अर्द्राच्या मिथुन भागात दरमहा सुमारे ६.५ अंश वेगाने असेल, तेव्हा विमान वाहतूक भरभराटीला येईल परंतु सुरक्षितता आणि सुरक्षा कमी असेल, असे तिने म्हटले होते. 

५ जूनची भविष्यवाणी काय होती...

याचबरोबर तिने टाटा आणि राफेल, इस्त्रो आदीबाबतही भविष्यवाणी केली आहे. टाटा हैदराबादमध्ये राफेल विमानाचे फ्यूजलेज बनवणार आहे. हा फक्त विमानचालन विस्तार आहे, येत्या दोन वर्षांत इस्रो अवकाश आणि उपग्रह अभियांत्रिकी, अंतराळ पर्यटनात जगाला आश्चर्यचकित करेल. गेल्या वर्षी नक्षत्र संक्रमणाद्वारे हे भाकीत केले होते. २०२५ मध्ये विमान अपघात आणि विमान वाहतुकीत विनाश होण्याची भविष्यवाणी मी अजूनही तशीच ठेवत आहे, अशी पोस्ट तिने ५ जूनला केली होती. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAstrologyफलज्योतिषAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातTwitterट्विटरairplaneविमान