ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 00:33 IST2025-05-19T00:31:40+5:302025-05-19T00:33:23+5:30

देशातील गोपनीय माहिती पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांना पुरवणाऱ्यांची शोध मोहीम सुरू आहे. ज्योती मल्होत्रानंतर अनेकजण आयएसआयचे एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. 

After Jyoti Malhotra, another ISI agent arrested, Uttar Pradesh ATS takes action | ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

Spying for Pakistan Latest News: हरयाणाच्या ज्योती मल्होत्राने यु-ट्यूबरच्या नावाखाली परदेशी दौरे करत पाकिस्तानच्याआयएसआयला माहिती पुरवल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आता उत्तर प्रदेश एटीएसने आणखी एका आयएसआय एजंटला अटक केली आहे. हा एजंट उत्तर प्रदेशातील रामपूरचा राहणार आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर गुप्तचर यंत्रणा, राज्यातील एटीएस आणि पोलिसांचे गुप्तचर विभाग सतर्क झाले आहेत. संशयास्पद हालचाली आणि संपर्क करणाऱ्यांच्या धांडोळा घेतला जात आहे. गेल्या दोन दिवसांत तीन ते चार जणांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेशातून आयएसआय एजंट अटक

उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी एका पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एका एजंटला अटक केली.

वाचा >>ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात 

शहजाद असे त्याचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये राहतो. मागील अनेक वर्षांपासून तो पाकिस्तान ये-जा करतो. कॉस्मेटिक्स, कपडे, मसाले आणि इतर सामानाची तो भारत-पाकिस्तान सीमेवरून तस्करी करण्याचे काम करायचा. 

आयएसआयच्या एजंटसोबत चांगले संबंध

या आडूनच त्याने पाकिस्तानच्या आयएसआयसाठी काम करायला सुरूवात केली होती. शहजादचे आयएसआय एजंटसोबत चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी तो सातत्याने संपर्कात होता. शहजादने देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती आयएसआय एजंटला दिली आहे. 

या माहितीची खात्री पटल्यानंतर लखनौ एटीएसने त्याला अटक केली आणि कलम १४८ आणि १५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश एटीएसच्या अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: After Jyoti Malhotra, another ISI agent arrested, Uttar Pradesh ATS takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.