शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:15 IST

१५ दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे विद्यार्थी निदर्शने करत आहेत. 

लेह : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन हिंसक वळणावर गेल्याने बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला, तर किमान ४५ जण जखमी झाले असून त्यात २२ पोलिसांचा समावेश आहे. ही गेल्या काही वर्षांतील सर्वात गंभीर घटना ठरली आहे.

१५ दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे विद्यार्थी निदर्शने करत आहेत. मात्र मागण्या पूर्ण होत नसल्याने निदर्शकांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. तेव्हाच हिंसाचार उफाळला. पोलिस व अर्धसैनिक दलाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज, अश्रुधूर आणि अगदी गोळीबाराचाही वापर केला. दरम्यान, लडाख ॲपेक्स बॉडीच्या युवक शाखेने हा आंदोलनाचा मोर्चा काढला होता. ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणातील दोन जणांची प्रकृती मंगळवारी ढासळल्याने आंदोलन पेटले.

वांगचुक काय म्हणाले?लडाखसाठी हा एक दुःखद दिवस आहे. आम्ही पाच वर्षांपासून शांततेच्या मार्गावर चालत आहोत. आम्ही उपोषण केले, लेह ते दिल्ली पर्यंत पायी चाललो. आज, आम्ही आमचा शांतीचा संदेश अपयशी होताना पाहत आहोत. हिंसाचार, गोळीबार आणि जाळपोळ सुरू आहे. मी लडाखच्या तरुण पिढीला हा मूर्खपणा थांबवण्याचे आवाहन करतो. आम्ही आमचे उपोषण सोडत आहोत आणि निदर्शने थांबवत आहोत. लडाखच्या तरुणांमध्ये प्रचंड निराशा आहे. रोजगार मिळत नाही, लोकशाही नाही आणि सहाव्या अनुसूचीचे आश्वासनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अशा टोकाच्या घटना घडत आहेत. मात्र हिंसा केल्याने आपले नुकसानच होईल.

मागण्या काय आहेत?लडाखला पूर्ण राज्याचा दर्जासहाव्या अनुसूचीचा विस्तारलेह आणि कारगिलसाठी स्वतंत्र लोकसभा जागासरकारी नोकरीत स्थानिकांना आरक्षण

काहींची प्रकृती चिंताजनकसहाव्या अनुसूचीतील तरतुदी आदिवासी लोकसंख्येसाठी शासन व स्वायत्ततेच्या दृष्टीने विशेष अधिकार देतात. गेल्या चार वर्षांत एलएबी व केडीएने सरकारशी अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा केली. मात्र तोडगा निघालेला नाही. २० सप्टेंबर रोजी केंद्राने नव्या चर्चेसाठी प्रतिनिधींना आमंत्रित केले, त्यानंतर आंदोलन पुन्हा जोरात सुरू झाले. लेह शहरात संध्याकाळपर्यंत तणावाचे सावट होते. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ladakh Gen Z demands statehood; protests turn violent, lives lost.

Web Summary : Ladakh's statehood protests turned violent, resulting in deaths and injuries. Protests, fueled by unmet demands for statehood and local job reservations, escalated despite appeals for peace. The situation remains tense with potential for further casualties.
टॅग्स :ladakhलडाख