अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:31 IST2025-10-12T13:29:31+5:302025-10-12T13:31:23+5:30
महिला पत्रकारांवरील कथित बंदीवरील वादानंतर, तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आणखी एक पत्रकार परिषद जाहीर केली आहे, यामध्ये महिला पत्रकारांना देखील आमंत्रित केले जाणार आहे.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
अफगाणिस्तानमध्ये सत्ता राबवत असलेल्या तालिबान सरकारमधील परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्तकी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुत्तकी यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने, या तालिबानी फर्मानाचीच अधिक चर्चा झाली. तसेच त्याबाबत संतापही व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेत महिलांना आमंत्रित केले जाणार आहे.
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
'पत्रकार परिषदेला फक्त दूतावासातील अधिकारी आणि काही निवडक पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. तत्पूर्वी, जेव्हा विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली, तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने देखील स्पष्टीकरण जारी केले. यामध्ये असे म्हटले होते की भारत पत्रकार परिषदेत सहभागी नव्हता.
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आग्रा दौरा रद्द
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आग्रा दौराही रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री रविवारी ताजमहालला भेट देणार होते, पण काही अनपेक्षित परिस्थितीमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. नियोजित वेळापत्रकानुसार, मुत्ताकी रविवारी सकाळी ११ वाजता ताजमहालला पोहोचणार होते आणि ताजमहालला भेट देऊन एक तास घालवल्यानंतर ते आग्र्यात दुपारचे जेवण घेणार होते आणि नंतर दिल्लीला परतणार होते. मुत्ताकी यांच्या आग्रा ताजमहालला भेट देण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. जिल्हा प्रशासनाच्या प्रोटोकॉल विभागाने मुत्ताकी यांच्या आग्रा दौऱ्याच्या रद्दची पुष्टी केली. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकी शनिवारी सहारनपूरमधील देवबंद येथील दारुल उलूम मदरसा येथे पोहोचले, तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.