Actor sonu sood will provide jobs to citizens collaborate with aepc | आता स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्याचं आश्वासन पूर्ण करणार सोनू सूद, APEC सोबत केला करार

आता स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्याचं आश्वासन पूर्ण करणार सोनू सूद, APEC सोबत केला करार

ठळक मुद्दे यापूर्वी सोनू सूदने 30 जुलैला आपल्या वाढदिवसानिमित्त तीन लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती.सोनू सूदने आता APEC नावाच्या एका कंपनीसोबत भागीदारी केली आहे.सध्या प्रत्येक जण त्याच्या कामाचे कौतुक करत आहे.

नवी दिल्ली - बॉलीवुड अ‍ॅक्टर सोनू सूद (Sonu Sood) सध्या अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. तो सातत्याने लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यापासून ते शेतकऱ्याला ट्रॅक्टर आणि रस्त्यावरच झोपलेल्या एका महिलेला घर देण्यापर्यंत सोनू सूदने बरीच कामं केली आहेत. आता तो लवकरच स्थलांतरित मजुरांसाठी रोजगाराची संधीही घेऊन येत आहे. सोनू सूदने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.

सोनू सूदने APEC नावाच्या एका कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या माध्यमातून सोनू स्थलांतरित मजुरांना नोकरी देण्याचे आश्वासन देत आहे. सोनूने यासंदर्भात ट्विट करून सांगितले, की 'जेथे इच्छा तेथे मार्ग. माझ्या स्थलांतरित भावांसाठी मी आता AEPC सोबत भागीदारी केली आहे. pravasirojgar.com च्या माध्यमाने देशभरातील 'अपॅरल मॅन्युफॅक्चर‍िंग आणि एक्सपोर्ट कंपन्यांत' 1 लाख नोकऱ्या देण्याचे मोठे आश्वासन. धन्यवाद, जय हिंद'.

यापूर्वी सोनू सूदने 30 जुलैला आपल्या वाढदिवसानिमित्त तीन लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. त्याने ट्विट केले होते, की 'माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या स्थलांतरित (प्रवासी) भावांसाठी pravasirojgar.com चा 3 लाख नोकऱ्यांसाठी माझा करार. या सर्व चांगला पगार, PF, ESI आणि इतरही सुविधा पुरवतात. धन्यवाद AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea आणि इतर सर्वांचे.'

सोनू सूद पूर्ण अंत:करणाने गरिबांना मदत करत आहे. सध्या प्रत्येक जण त्याच्या कामाचे कौतुक करत आहे. अनेक लोक त्याच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात मागत आहेत आणि तोही सर्वांच्या मैसेजला उत्तर देत त्यांना मदत करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus Vaccine : प्रतीक्षा संपली! 12 ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचं रशिया करणार रजिस्ट्रेशन

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

CoronaVirus vaccine : याच वर्षी 3 नोव्हेंबरपर्यंत तयार होऊ शकते अमेरिकन कोरोना लस, ट्रम्प म्हणाले... 

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor sonu sood will provide jobs to citizens collaborate with aepc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.