शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टार्ट-अप इंडिया’चा कृती आराखडा १६ जानेवारीला सादर करणार

By admin | Updated: December 27, 2015 23:00 IST

देशातील युवकांसाठी असलेल्या आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’चा कृती आराखडा येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येईल

नवी दिल्ली : देशातील युवकांसाठी असलेल्या आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’चा कृती आराखडा येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येईल आणि राज्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये या मोहिमेचा प्रचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी बोलत होते. युवकांसाठी असलेली ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’ ही योजना गरीब आणि युवकांसाठी नव्या संधी घेऊन येईल. हे कसे घडेल? काय घडेल? काय होईल? याबाबतची एक कृती योजना तुमच्यासमोर मांडण्यात येईल. देशभरातील आयआयटी, आयआयएम, सर्व केंद्रीय विद्यालये, एनआयटी आणि जेथे जेथे युवा पिढी आहे त्या सर्वांना थेट संपर्काद्वारे या कार्यक्रमाशी जोडले जाईल, असे मोदी म्हणाले. स्टार्ट-अपबाबत आपल्याकडे एक समज आहे. जसे डिजिटल जग असो वा आयटी व्यवसाय, हा स्टार्ट-अप त्या लोकांसाठीच आहे, असे मानले जाते; पण तसे नाही. आम्हाला त्यात भारताच्या गरजांनुसार बदल करावयाचा आहे. गरीब माणूस कुठेतरी मोलमजुरी करतो. त्याला शारीरिक श्रम करावे लागतात; परंतु युवकांनी अशी एखादी वस्तू तयार करावी, की ज्यामुळे या गरिबाला मजुरी करताना थोडा दिलासा मिळेल. मी त्यालाच स्टार्ट असे मानतो, असे त्यांनी सांगितले. भारत स्टार्ट-अप राजधानी बनू शकतो काय? आमच्या राज्यांमध्ये युवकांसाठी रोजगाराची संधी म्हणून नवनवे स्टार्ट, बांधकाम क्षेत्र, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र आदींमध्ये नवनवे उपक्रम सुरू केले जाऊ शकतात काय, असा सवाल करून मोदी पुढे म्हणाले, प्रत्येक गोष्टीत नावीन्य, नवीन पद्धत, नवा विचार असावा. जग नव्या उपक्रमांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया युवा पिढीसाठी एक फार मोठी संधी घेऊन आलेला आहे. युवकांना मदत करा, असे मी बँकांना सांगणार. हिमतीने पुढे जा, असे युवकांनाही सांगणार. मार्केट मिळेलच. भारतातील प्रत्येक युवकाकडे प्रतिभा आहे. त्यांना फक्त संधी हवी आहे.> अपंगांसाठी ‘दिव्यांग’ शब्द वापरण्याचा सल्लाशारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्ती स्वत:मध्ये फार सक्षम असतात आणि त्यांचे कार्यकर्तृत्व आश्चर्यचकित करणारे असते. हे कार्यकर्तृत्व पाहून त्यांच्यात दिव्य शक्ती असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे अशा अपंग व्यक्तींसाठी ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग करणे उचित ठरू शकेल, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली.