"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 08:44 IST2025-10-26T08:43:41+5:302025-10-26T08:44:26+5:30
आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील २६ वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील २६ वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी आरोपी पोलिसाचा एन्काउंटर करण्याची मागणी केली. सातारा घटनेत सहभागी असलेल्या पोलिसावर कठोर कारवाई करावी. त्याचा एन्काउंटर करा. तसेच इतर महिला डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळावं अशी मागणीही त्यांनी केली.
आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वडिलांनी म्हटलं की, "जोपर्यंत आरोपी पोलिसावर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत अशा प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करता येते हा संदेश पोहोचणार नाही. महिला डॉक्टरसोबत अशी घटना घडणं हे अत्यंत दुःखद आहे."
"आरोपीला ताबडतोब गोळ्या घाला"
"आरोपीला ताबडतोब गोळ्या घातल्या पाहिजेत. अशी माणसं समाजात राहण्यास योग्य नाहीत आणि त्यांना अजिबात दया दाखवू नका. अशा प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनाची कृती इतकी उदासीन आहे हे खेदजनक आहे. यामुळे आरोपींना हिंमत मिळते. अशा प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्यांवर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी."
"अनेक आश्वासनं दिली, पण..."
"२०२४ मध्ये महिला आयोगाचे सदस्य आमच्या घरी आले होते आणि आम्हाला अनेक आश्वासनं दिली, पण इतका वेळ होऊनही त्यांनी काय केलं? या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाही. पश्चिम बंगाल महिला आयोगाच्या सदस्य कोणत्याच कामाचे नाहीत. ते फक्त तोंड दाखवण्यासाठी येतात आणि नंतर निघून जातात. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नये."