Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:11 IST2025-07-01T15:07:51+5:302025-07-01T15:11:18+5:30
Uttar Pradesh Accident Video: हॉटेलमधून बाहेर पडत असताना समोरून कार आली आणि तिने चौघांना चिरडले. काही जण वेळीच पळाल्याने त्यांचा जीव वाचला. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये ही घटना घडली आहे.

Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
हॉटेलमधून बाहेर पडले. पायऱ्या उतरत असतानाच समोरू भरधाव कार आली तिने काही चार जणांना चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. धडकी भरवणारा हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेतील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना राष्ट्रीय महामार्ग ९ वर घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा अपघात रेकॉर्ड झाला आहे.
कारने चौघांना चिरडले, एकाचा जागेवरच मृत्यू; व्हिडीओमध्ये काय?
समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, नेहमीप्रमाणे हॉटेल बाहेर लोक आहेत. काही लोक वाट बघताना दिसत आहेत. तर काही बाहेर पडत आहेत. तीन-चार जण पायऱ्या उतरून खाली येतात. त्याचवेळी एक व्यक्ती समोरून येत असलेली कार बघून बाजूला पळतो.
वाचा >>पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच...
पण, इतर चौघांना बाजूला पळण्यासाठी वेळच मिळत नाही. क्षणार्धात कार येते आणि चौघांना चिरडते. कार इतकी वेगात होती की पायऱ्या चढून आणि कारंजा ओलांडून ती हॉटेलच्या दरवाजापर्यंत जाते. कार हॉटेलच्या दारापर्यंत गेल्यानंतर एकच गोंधळ उडतो. लोक सैरावैर धावतात. यात एकाचा जागेवर मृत्यू झाला. तर तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
High-speed car losses control, rams into people standing outside a hotel in Hapur #UttarPradesh
— Nabila Jamal (@nabilajamal_) July 1, 2025
One dead, 3 critically injured
Driver fled the scene. CCTV footage being reviewed, police hunting for the accused #Hapurpic.twitter.com/J3DqnVWdta
या घटनेनंतर कारचा चालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना हापुड जिल्ह्यातील बाबूगड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. हवेली हॉटेलच्या आवारात हा अपघात घडला.