२६ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी खरेदी केला केक, घरी परतताना भीषण अपघातात गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:35 IST2025-02-13T15:35:08+5:302025-02-13T15:35:33+5:30
Accident In Rajasthan: राजस्थानमधील अलवर येथे बुधवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एक २६ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या दिवशी या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला, त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता.

२६ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी खरेदी केला केक, घरी परतताना भीषण अपघातात गेला जीव
राजस्थानमधील अलवर येथे बुधवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एक २६ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या दिवशी या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला, त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणि आईसक्रिम घेऊन घरी जात असतानाच एका भरधाव गाडीने त्याला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या या काही वेळातच मृत्यू झाला.
अलवरमधील आंबेडकर सर्कलजवळ एका दुचाकीस्वार तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातानंतर तिथल्या स्थानिक लोकांना या तरुणाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच त्याच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. नातेवाईक जेव्हा जिल्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा तेथील डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले.पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह कुटुंबायांच्या ताब्यात दिला.
अधिक माहितीनुसार संजय कुमार कोली असं मृत तरुणाचं नाव असून, त्याचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणि आईसक्रिम आणण्यासाठी तो बाजारात गेला होता. मात्र तिथून परतत असताना रात्री दहाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यात संजय हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.