Accident: ४० मृत्यू प्रति १०० किमी! रस्ते अपघाताचे भयावह चित्र, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 09:34 AM2022-09-03T09:34:44+5:302022-09-03T09:35:10+5:30

Accident: देशात दिवसेंदिवस वाहनांची संख्या  वाढत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी (२०२१) रस्ते अपघातांत १,५५,६२२ जणांचा मृत्यू झाला असून, २०२० च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ झाली आहे,

Accident: 40 deaths per 100 km! Scary picture of road accidents, National Crime Records Bureau report | Accident: ४० मृत्यू प्रति १०० किमी! रस्ते अपघाताचे भयावह चित्र, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

Accident: ४० मृत्यू प्रति १०० किमी! रस्ते अपघाताचे भयावह चित्र, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

googlenewsNext

 -नितीन जगताप 
मुंबई : देशात दिवसेंदिवस वाहनांची संख्या  वाढत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी (२०२१) रस्ते अपघातांत १,५५,६२२ जणांचा मृत्यू झाला असून, २०२० च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या अहवालातून समोर आली आहे. २०२० मध्ये रस्ते अपघातात १,३३,२०१ जणांचा मृत्यू झाला होता.

एकीकडे रस्ते अपघातात मृत्यूची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे अद्यापही काही राज्य सरकारांनी सुधारित मोटार वाहन कायदा लागू केला नाही. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये या कायद्यामुळे अपघाती मृत्यूत ८.३४ आणि ६.४१ टक्के घट झाली आहे. ज्या महामार्गावर किंवा द्रुतगती मार्गावर सर्वाधिक अपघात आणि मृत्यू झाले आहेत, ते निश्चित करून अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज असून, ते झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉरमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. 
- पीयूष तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेव्ह लाइफ फाउंडेशन. 

अपघाताची कारणे 
    घटना     मृत्यू 
धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे     १०३६२    ४२८५३
भरधाव वेगाने वाहन चालविणे     २४०८२८    ८७०५० 
मद्यपान करून वाहन चालविणे     ७७१८    २९३५ 
सदोष वाहन चालविणे      ४३०६    २०२२ 
थकवा असताना वाहन चालविणे     २०५७    ९६२
रस्ते पायाभूत सुविधांचा अभाव     २४४३    ११२९ 
 नियमबाह्य वाहन पार्किंग     २७७१    १३३३  

महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
४,०३,११६ देशातील अपघात
३,७,१८८४ जखमी
१,५५,७२२ मृत्यू 

मृतांमध्ये तरुणांचा समावेश सर्वाधिक 

 तमिळनाडूमध्ये १५,३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण  ९.८९  टक्के आहे.
महाराष्ट्रात १३,९११ जणांनी जीव गमावला असून, हे प्रमाण  ८.९४  टक्के आहे.  
गेल्या वर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दीड लाख लोकांमध्ये ६३ टक्के तरुणांचा समावेश आहे. 
राज्यांची तुलना केल्यास उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २१,७९२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. देशातील एकूण मृत्यूपैकी हे प्रमाण ११४ टक्के आहे. 

Web Title: Accident: 40 deaths per 100 km! Scary picture of road accidents, National Crime Records Bureau report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.