शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

'आप'च्या दोन आमदारांवर अटकेची टांगती तलवार

By admin | Updated: September 12, 2016 14:14 IST

आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आपच्या आणखी दोन आमदारांना पोलिस अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,दि.12- आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आपच्या आणखी दोन आमदारांना पोलिस अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओखला येथील आमदार अमानतुल्लाहविरोधात छेडछाडीच्या आरोपामुळे एफआयआर दाखल कऱण्यात आली आहे. तसेच, मालवीय नगरचे आमदार सोमनाथ भारती यांच्याविरोधातही 'एम्स'च्या संपत्तीला नुकसान पोहोचवल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गळ्याच्या सर्जरीसाठी बंगळुरूला जाणार आहेत. केजरीवालांच्या अनुपस्थितीत दोन्ही आमदारांना अटक होण्याची शक्यता आहे
 
पेन ड्राइव्हमध्ये आहेत पुरावे?
ओखलाचे आमदार अमानतुल्लाहविरोधात त्यांच्या मेव्हण्याच्या पत्नीने  छेडछाड केल्याचा आरोप  केला आहे.  या प्रकरणी महिलेने जामिया नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपानंतर अमानतुल्लाह यांनी पक्षाकडे राजीनामा दिला होता मात्र हे प्रकरण त्यांच्या कुटुंबाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी त्यांचा राजीनामा स्विकारायला नकार दिला.
अमानतुल्लाहविरोधातील भक्कम पुरावे आपल्याकडे असून , पुरावे असलेला पेन ड्राइव्ह पोलिसांना देणार असल्याचं तक्रारदार महिलेने सांगितलं.
गेल्या दीड वर्षांपासून अमानतुल्ला त्रास देत असून यामध्ये स्वतःचा पतीदेखील अमानतुल्लाची साथ देतो अशी तक्रार या महिलेने केली आहे. पोलिसांनी  अमानतुल्लाविरोधात आयपीसी कलम 354, 506, 509, 498ए आणि 120बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.