शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

...म्हणून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली; लेखकानं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 13:48 IST

पक्षाचा आदेश अंतिम; लेखकाकडून वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे संकेत

नवी दिल्ली: भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनी त्यांची बाजू मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेतात. मोदींचा कारभार शिवरायांसारखा असल्याचं मला वाटतं. त्यामुळेच पुस्तकाला 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' नाव दिल्याचं गोयल म्हणाले. पुस्तक बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुस्तक मागे घेण्याचीदेखील तयारी दर्शवली. ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलंमोदी पंतप्रधान व्हायच्या आधी देशात दहशतवादी हल्ले व्हायचे. मुंबई, दिल्लीसह देशभरात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडवले जायचे. अगदी संसदेवर हल्ले करण्यापर्यंत दहशतवाद्यांची मजल गेली होती. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही मोठा दहशतवादी झालेला नाही, असा दावा गोयल यांनी केला. पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात झालेल्या हल्ल्यांना सर्जिकल स्ट्राइकनं प्रत्युत्तर देण्याची धमक मोदींनी दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच मोदींनी आपल्या बांधवांच्या रक्षणासाठी धाडसी निर्णय घेतले, असं गोयल यांनी म्हटलं. मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवालजय भगवान गोयल यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुनही (एनआरसी) मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत सगळ्यांना धर्मशाळा वाटायचा. मात्र आता तशी परिस्थिती नाही. सीएएमुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. तर एनआरसीमुळे घुसखोरांना आळा बसणार आहे, असं गोयल यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचे. मोदी 'सब का साथ, सब का विकास'च्या माध्यमातून तेच करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. 'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समजमोदी पंतप्रधान झाल्यापासून जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली असल्याचं गोयल म्हणाले. मोदी आणि शिवरायांशी तुलना करून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. मोदी आणि शिवरायांची कार्यशैली मला सारखीच वाटते. मोदी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच धाडसी निर्णय घेतात, असं म्हणत गोयल यांनी काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० चा संदर्भ दिला. यावेळी त्यांना सध्या निर्माण झालेला वाद पाहता पुस्तक मागे घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आता पुस्तक तर बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल, असं उत्तर दिलं. 

टॅग्स :aaj ke shivaji narendra modi bookआज के शिवाजी नरेंद्र मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBJPभाजपा