'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 11:18 AM2020-01-13T11:18:57+5:302020-01-13T11:40:19+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला

Nobody can be compared to Chhatrapati Shivaji Maharaj - Shivendra Raj Bhosale | 'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज

'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज

googlenewsNext
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावरून मोठा वाद संजय राऊत, छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी भाजपावर केली टीका शिवेंद्रराजे भोसलेंनीही यावरून भाजपालाच घरचा आहेर दिला आहे.

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर संजय राऊत, छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. तर शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या शिवेंद्र राजे भोसलेंनीही या पुस्तकावर लागलीच बंदी घाला, अशी मागणी भाजपा नेतृत्वाकडे केली आहे. शिवेंद्रराजे भोसलेंनीही यावरून भाजपालाच घरचा आहेर दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्यासह देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर पुरुषांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला पक्षामध्ये अतिउत्साही कार्यकर्ते असतात. ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असले प्रकार होतात. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर चिखलफेक आणि आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळते. अशा अतिउत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मी पक्षनेतृत्वाला विनंती करत आहे. त्यांना योग्य ती समज द्या. या पुस्तकाचं प्रकाशन झालं असलं तर ते थांबवावं किंवा ते पुढे वितरीत करू नये, असंही शिवेंद्र राजे भोसले म्हणाले आहेत. 
मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल

मोदींची तुलना शिवरायांशी, भाजपच्या पुस्तकावर संताप; शिवप्रेमींकडून टीकेची झोड

दरम्यान, 'आज के शिवाजी' या वादग्रस्त पुस्तकावरून भाजपाला धारेवर धरणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही भाजपाला लक्ष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व मुद्द्यांवर लगेच भूमिका मांडणारे भाजपा नेते शिवराय आणि मोदींच्या तुलनेवर संध्याकाळपर्यंत स्वत:ची भूमिका मांडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, असं मजकूर असलेलं 'आज के शिवाजी'  या पुस्तकाचे रविवारी दिल्ली येथील भाजपा कार्यालयात प्रकाशन झालं होते. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. 

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...

शाब्बास भाजपा; 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'वरुन शिवसेनेचा खोचक टोला

Web Title: Nobody can be compared to Chhatrapati Shivaji Maharaj - Shivendra Raj Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.