रात्रीच्या वेळी प्रियकर प्रेयसीच्या घरी पोहोचला; नातेवाईकांनी नको त्या अवस्थेत पाहताच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 19:49 IST2023-03-28T19:49:20+5:302023-03-28T19:49:51+5:30

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

A young man who went to meet his girlfriend in Bulandshahr in Uttar Pradesh was killed by the girl's family members    | रात्रीच्या वेळी प्रियकर प्रेयसीच्या घरी पोहोचला; नातेवाईकांनी नको त्या अवस्थेत पाहताच संपवलं

रात्रीच्या वेळी प्रियकर प्रेयसीच्या घरी पोहोचला; नातेवाईकांनी नको त्या अवस्थेत पाहताच संपवलं

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरुणाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली. आपल्या प्रेयसीला भेटायला गेला असता तरूणाची तरूणीच्या कुटुंबीयांनी हत्या केली. बुलंदशहरच्या दिबई पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका गावात रात्री प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आली. प्रेयसीच्या नातेवाईकांनी घरी बोलावून हत्या केल्याचा आरोप मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री दिबई पोलीस ठाण्याच्या परिसरातील गावात एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. तिथे मुलीच्या नातेवाईकांनी दोघांना रात्रीच्या वेळी आक्षेर्पाह स्थितीत रंगेहात पकडले. मग संतापलेल्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. परिसरात घटनेची माहिती पसरताच तरूणाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून त्याला आपल्या घरी नेले.

22 वर्षीय तरूणाचा मृत्यू 
तरूणाला बेदम मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्याची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 22 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर मृताच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला घरी बोलावून मारहाण केल्याचा आरोप तरूणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: A young man who went to meet his girlfriend in Bulandshahr in Uttar Pradesh was killed by the girl's family members