धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 10 दिवसांनंतर मृतदेह सापडला 'कबरीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 16:49 IST2023-02-02T16:48:49+5:302023-02-02T16:49:36+5:30

झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

A wife killed her 40-year-old husband with the help of her boyfriend in Bokaro, Jharkhand    | धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 10 दिवसांनंतर मृतदेह सापडला 'कबरीत'

धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 10 दिवसांनंतर मृतदेह सापडला 'कबरीत'

बोकारो : झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी कबर खोदून मृतदेह पुरला. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी कबर खोदून मृतदेह बाहेर काढला आहे. ही धक्कादायक घटना जराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुम्हारडीह गावातील आहे. 22 जानेवारी रोजी बेपत्ता असलेल्या महिलेच्या 40 वर्षीय पतीचा मृतदेह महिलेच्या प्रियकराच्या घराजवळील कबरीतून बाहेर काढण्यात आला.

मृत उमा शंकर राय 22 जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांचा भाऊ रंजीत राय यांनी 25 जानेवारी रोजी पोलिसांत याप्रकरणाची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी तपासास सुरूवात केली. तपासादरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की, मृत उमा शंकर यांची पत्नी सीता देवी हिचे गावातील राहुल कुमार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. 

पत्नीचे सुरू होते प्रेमसंबंध 
उमाशंकर यांच्या अनुपस्थितीत राहुल सीतेला भेटण्यासाठी घरी जात असे. अशातच एके दिवशी उमाशंकर यांनी दोघांनाही घरात रंगेहाथ पकडले. यादरम्यान उमा शंकर आणि राहुल यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होऊ लागले. दरम्यान, 22 जानेवारी रोजी उमाशंकर अचानक बेपत्ता झाले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराच्या घरासमोरील कबरीतून उमा शंकर यांचा मृतदेह बाहेर काढला. 

पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा शंकर यांची हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या माहितीवरून दंडाधिकारी नरेश रजक यांच्या उपस्थितीत मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी सीता आणि राहुल कुमार यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. हत्या केव्हा आणि कशी झाली, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरूनच स्पष्ट होणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: A wife killed her 40-year-old husband with the help of her boyfriend in Bokaro, Jharkhand