शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 10:07 IST2025-08-21T10:07:00+5:302025-08-21T10:07:32+5:30
Uttarakhand Crime News: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकावर कट्ट्यामधून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक घटना उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथील एका खाजगी शाळेमध्ये घडली आहे.

शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकावर कट्ट्यामधून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक घटना उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथील एका खाजगी शाळेमध्ये घडली आहे. विद्यार्थ्याने झाडलेली गोळी ही शिक्षकाच्या उजव्या खांद्याच्या खालील भागात लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
सदर शिक्षकाने विद्यार्थ्याला शाळेत मारले होते. त्यावरून सदर शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर एकेदिवशी सदर विद्यार्थ्याने आपल्या लंच बॉक्समध्ये कट्टा लपवून शाळेत आणला होता. तसेच वर्ग सुरू असतानाच शिक्षकावर गोळीबार केला.
या घटनेमुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तसेच उत्तराखंडमधील सीबीएसई बोर्डाशी संबंधित शिक्षकांनी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करत संप पुकारला आहे. तसेच काशीपूरसह अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आरोपी विद्यार्थाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील कट्टा जप्त करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.