शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

कर महसुलामध्ये झाली 95% वाढ; प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रमुख मोहपात्रा यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 3:58 PM

मोहपात्रा यांनी सांगितले की, परतावे वजा केल्यानंतर उरणारे प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन यंदा ३.४० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ते ९५ टक्क्यांनी अधिक आहे.

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचे प्रत्यक्ष करांचे संकलन तब्बल ९५ टक्क्यांनी वाढून ३.४० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) चेअरमन जे. बी. मोहपात्रा यांनी ही माहिती दिली.

मोहपात्रा यांनी सांगितले की, परतावे वजा केल्यानंतर उरणारे प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन यंदा ३.४० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ते ९५ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलन आदल्या वर्षाच्या तुलनेत ५१ टक्क्यांपेक्षा अधिक राहिले. कर संकलनाचे उद्दिष्ट यंदा आम्ही गाठू शकू, याबाबत आम्ही आता आशावादी झालो आहोत.

सीबीडीटी प्रमुखांनी सांगितले की, वित्त वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीत प्रतिभूती व्यवहार करातून (एसटीटी) विक्रमी ५,३७३ कोटी रुपये मिळाले. वित्त वर्ष २०२० च्या तुलनेत या कराच्या संकलनात १०९ टक्के वाढ झाली आहे.

शेअर बाजारात सूचीबद्ध अथवा बिगर सूचीबद्ध समभागांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर जो कर लावला जातो, त्यास एसटीटी म्हटले जाते. डेरिव्हेटिव्हज, समभागाशी जोडलेले म्युच्युअल फंड, कर्जरोखे आणि रोखे यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरही हा कर लावला जातो.

४५ हजार कोटींहून अधिक परतावेमोहपात्रा यांनी सांगितले की, १ एप्रिल २०२१ ते २ ऑगस्ट २०२१ या दरम्यान सीबीडीटीने २१.३२ लाख करदात्यांना ४५,८९६ कोटी रुपयांचे कर परतावे दिले आहेत. २०,१२,८०२ प्रकरणांत १३,६९४ कोटींचे प्राप्तिकर परतावे, तर १,१९,१७३ प्रकरणांत ३२,२०३ कोटींचे कंपनी कराचे परतावे आहेत.