्रपालखी मार्गावर ९३ उपचार केंद्रे

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30

सेालापूर: आषाढी सोहळ्यासाठी येणार्‍या प्रत्येक पालखीच्या मार्गावर आरोग्य विभागाची २४ तास उपचार केंद्रे राहणार आहेत़ पालखी मुक्कामाच्या ठिकाणी १०८ क्रमांकाची आरोग्य सेवेची गाडी तसेच वैद्यकीय अधिकारी राहणार आहेत़ यामध्ये देखील वारकर्‍यांना उपचार केले जाणार आहे़ पालखी परत जाईपर्यंत ही उपचार केंद्रे कार्यरत राहतील अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ सुनील भडकुंबे यांनी दिली़ प्रत्येक पाण्याची चाचणी घेतली जाणार असून, आरोग्य निरीक्षकाची सही घेतल्याशिवाय टँकरचे पाणी दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले़ आरोग्य विभागाकडे १० वाकीटॉकी सेट दिले जाणार असल्याचे त्यांनी संागितले़ आरोग्य समितीचे सभापती मकरंद निंबाळकर यांनी देखील वारीबाबत आढावा घेतला़

93 treatment centers on the runway | ्रपालखी मार्गावर ९३ उपचार केंद्रे

्रपालखी मार्गावर ९३ उपचार केंद्रे

ालापूर: आषाढी सोहळ्यासाठी येणार्‍या प्रत्येक पालखीच्या मार्गावर आरोग्य विभागाची २४ तास उपचार केंद्रे राहणार आहेत़ पालखी मुक्कामाच्या ठिकाणी १०८ क्रमांकाची आरोग्य सेवेची गाडी तसेच वैद्यकीय अधिकारी राहणार आहेत़ यामध्ये देखील वारकर्‍यांना उपचार केले जाणार आहे़ पालखी परत जाईपर्यंत ही उपचार केंद्रे कार्यरत राहतील अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ सुनील भडकुंबे यांनी दिली़ प्रत्येक पाण्याची चाचणी घेतली जाणार असून, आरोग्य निरीक्षकाची सही घेतल्याशिवाय टँकरचे पाणी दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले़ आरोग्य विभागाकडे १० वाकीटॉकी सेट दिले जाणार असल्याचे त्यांनी संागितले़ आरोग्य समितीचे सभापती मकरंद निंबाळकर यांनी देखील वारीबाबत आढावा घेतला़

Web Title: 93 treatment centers on the runway