शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पावसाचे ९२ बळी, मंगळवारपर्यंत संततधार सुरूच राहण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:49 AM

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

लखनौ : उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य हाती घेतले आहे. ही संततधार सोमवारी, मंगळवारीही सुरूच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.गुजरातमध्ये राजकोट जिल्ह्यात पुरात तीन महिला बुडाल्या आहेत. उत्तराखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थानात मुसळधार पावसाने १३ जणांचा बळी घेतला आहे. काश्मिरात एका ५४ वर्षीय उप निरीक्षकाचा बुडून मृत्यू झाला.उत्तर प्रदेशातील पूर्व भागाला मुसळधार पावसाला जोरदार तडाखा बसला आहे. शनिवारी प्रयागराजमध्ये १०२.२ मिमी, तर वाराणसीमध्ये ८४.२ मिमी इतका पाऊस पडला. या भागात यंदा पडलेल्या पावसापेक्षा हे प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्ये पावसामुळे शुक्रवारपासून ७९ जण मरण पावले आहेत. लखनऊ, अमेठी, हरदोई व अन्य काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. पावसाचा तडाखा बसलेल्यांना व पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेआहेत. (वृत्तसंस्था)बिहारमध्ये रुग्णालये जलमय; वैद्यकीय सेवाही कोलमडलीबिहारमध्ये ४८ तासांत मुसळधार पावसाने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. भागलपूरमध्ये पावसामुळे एक भिंत कोसळून तीन जण ठार झाले. पाटणामध्ये नालंदा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह अनेक रुग्णालयांत पावसाचे पाणी शिरले असून, त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.रुग्णालयांतील परिसर जलमय झाल्याने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स नेणे कठीण झाल्याने आजारी व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.मुझफ्फरपूर, दरभंगा, पूर्व चंपारण्य, गया, भोजपूर, भागलपूर आदी जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून, तेथील पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवावी, असा आदेश बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रशासनाला दिला आहे. या राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांतील शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :RainपाऊसUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार