शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के विद्यार्थ्यांना मिळत नाही व्यावसायिक मार्गदर्शन! अभ्यासातून काढला निष्कर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:15 IST

सात राज्यांतील तब्बल २१,२३९ विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून काढला निष्कर्ष 

नवी दिल्ली : ‘करिअर काय करायचं?’ - हा प्रश्न दहावी-बारावीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना भेडसावतो. मात्र, उत्तर शोधायला आवश्यक ते व्यावसायिक मार्गदर्शनच जवळपास ९० टक्के भारतीय विद्यार्थ्यांना मिळत नाही, अशी धक्कादायक बाब संयुक्त राष्ट्र प्रायोजित एका अभ्यासातून पुढे आली आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात, पंजाब, कर्नाटक व राजस्थान या सात राज्यांतील १४ जिल्ह्यांमधील तब्बल २१,२३९ विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शालेय पातळीवरही ही दरी स्पष्ट दिसते. संसाधने चांगली असूनही खासगी  ४१ टक्के, तर सरकारी शाळांतील ३५ टक्के विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या निवडीबाबत गोंधळलेले आहेत. ‘बॅकअप’ करिअर प्लॅन तयार करणारे विद्यार्थी २२ टक्के आहेत. 

मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, तज्ज्ञांचे मत  

आजच्या स्पर्धेच्या युगात करिअरच्या असंख्य वाटा उपलब्ध आहेत. परंतु, योग्य मार्गदर्शनाशिवाय विद्यार्थी आपली खरी क्षमता आणि आवड ओळखण्यात मागे पडतात. त्यामुळे व्यावसायिक मार्गदर्शन प्रणाली मजबूत करणे आणि शालेय स्तरावरच करिअरविषयक सल्ला देण्याची व्यवस्था उभारणे अत्यावश्यक असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. 

काय आहेत मुख्य अडथळे?

अभ्यासानुसार, विद्यार्थ्यांसमोर करिअर ठरविताना प्रामुख्याने खालील अडथळे निर्माण होतात, अचूक माहितीचा अभाव, करिअरविषयी एकूणच जागरूकतेचा अभाव, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचा दबाव,अभ्यासक्रमाचा खर्च आणि संधी याबाबतची अनिश्चितता आणि संभ्रम या प्रमुख अडचणी ठरत आहेत.

अभ्यासातील निष्कर्ष कोणते ?

> ३८ टक्के विद्यार्थी पुढे कोणत्या पातळीपर्यंत शिक्षण घ्यायचे, याबाबत गोंधळलेले आहेत.> १० टक्के विद्यार्थ्यांनाच शिक्षणाचा खर्च किती येणार याची कल्पना आहे.> ८१ टक्के विद्यार्थी करिअर नियोजनाशी निगडित अडचणींचा सामना करत आहेत.

या अडचणींमध्ये मर्यादित माहिती, आत्मजागरूकतेचा अभाव, नातलग, मित्रांचा दबाव, आर्थिक नियोजनाची गफलत याचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 90% of Indian students lack career guidance: Study reveals.

Web Summary : A UN-sponsored study reveals 90% of Indian students lack career guidance. Students face hurdles like limited information, family pressure, and financial uncertainties. Experts emphasize strengthening career counseling in schools.
टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनEducationशिक्षण