शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

७७ वर्षांचे आजोबा तब्बल ४७ व्यांदा देणार दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 4, 2016 13:08 IST

राजस्थानमधील शिवचरण यादव हे ७७ वर्षीय इसम गेल्या ४६ वर्षांपासून १०वीची परीक्षा देत असून यावर्षी ते ४७ व्यांदा परीक्षेस बसणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. ४ - एखादी व्यक्ती कोणत्याही परीक्षेत किती वेळा नापास होऊ शकेल ? एक, दोन वा जास्तीत जास्त १० वेळा! पण राजस्थानमधील शिवचरण यादव हे ७७ वर्षीय इसम गेल्या ४६ वर्षांपासून १०वीची परीक्षा देत असून प्रत्येक वेळेस एखादा विषय राहिल्याने ते नापास झाले आहेत. यावर्षी १० मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरू होणार असून ते ४७ व्यांदा परीक्षा देणार  आहेत. विशेष म्हणजे इतक्या वेळा अपयश मिळूनही ते खचले नसून कोणत्याही परिस्थितीत आपण या परीक्षेत उत्तीर्ण होऊच, असा निर्धार करून ते यंदाही रात्रभर जागून अभ्यास करण्यात मग्न आहेत. 
राजस्थनाच्या अलवर जिल्ह्यातील खोहारी गावात राहणारे ७७ वर्षांचे शिवचरण यादव हे वाड-वडिलांच्या काळापासून असलेल्या घरात एकटेच राहतात. येत्या १० मार्चपासून राज्यातील दहावीची परीक्षा सुरू होणार असून यावर्षी तरी आपण नक्की यशस्वी होऊ असा विश्वास त्यांना आहे. आणि जोपर्यंत १० वी उत्तीर्ण होणार नाही, तोपर्यंत आपण लग्न करणार नाही असा 'पण' त्यांनी केला आहे. 
शिवचरण सांगतात, '१९६८ साली मी पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली, मात्र त्यावर्षी मी नापास झालो. तेव्हापासून असंच सुरू आहे, मी काही विषयांत उत्तीर्ण होतो, पण माझे इतर काही विषय अडकतात. जर गणित आणि विज्ञानात चांगले मिळाले तर मी हिंदी आणि इंग्रजीत नापास होता. सुमारे २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९५ साली मी दहावी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगदीच नजीक पोहोचलो, त्यावर्षी मी जवळजवळ सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झालो, पण नेमका गणितात नापास झालो. पण तरीही मी प्रयत्न करणं सोडलं नाही. गेल्या ३० वर्षांपासून मी माझ्या पूर्वजांच्या घरात एकटाच राहत आहे. सरकारतर्फे वृद्धांना देण्यात येणारे पेन्शन आणि शेजारील मंदिरातून मिळणार प्रसाद यावर मी आत्तापर्यंत गुजारण केली. मात्र यावर्षी मी नक्कीच पास होईन' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.