शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना घाबरवणे पडले महागात; पोलिसांनी सात भुतांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:06 IST

एका रिक्षाचालकांने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत रस्त्यावर भूत फिरत असल्याचे सांगितले होते.

बंगळुरू - रात्रीच्या वेळी भूत बनून ये जा करणाऱ्यांना घाबरवणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. भुतांचे सोंग घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्यांना भीती दाखवणाऱ्या सात जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार बंगळुरू येथील  यशवंतपूरमधील शरीफानगर परिसरात उघडकीस आला आहे. गेल्या काही काळात सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावासोबत प्रँक व्हिडीओ बनवण्याचे प्रमाणही वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यशवंतपूरमधील शरीफानगर परिसरात असलेल्या वस्तीत राहणारे हे सात तरुण यूट्युबवर प्रँक व्हिडीओ शेअर करत असत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भून बनून प्रँक व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी ते संध्याकाळ होताच हे तरुण भुतांचे रूप घेऊन रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना घाबरवत असत. दरम्यान, या प्रकाराविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या.त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत भूत बनून लोकांना घाबरवणाऱ्या या तरुणांना अटक केली. 

याबाबत अधिक माहिती देताना पोलिस अधिकारी शशिकुमार यांनी सांगितले की, एका रिक्षाचालकांने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत रस्त्यावर भूत फिरत असल्याचे सांगितले होते. तसेच काही तरुण रस्त्यांवर प्रँक करत असल्याची तक्रार आधीही आली होती. त्यानंतर काही दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आम्ही या सर्व तरुणांना अटक केली. हे सर्व तरुण आसपासच्या वस्त्यांमध्ये राहणारे असून, केवळ मजा करण्यासाठी ते लोकांना घाबरवत असत.

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारी