शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 06:14 IST

Naxals Killed  in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात बुधवारी मारेडूमिल्ली येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले.

आंध्र प्रदेशात बुधवारी मारेडूमिल्ली येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले. याच परिसरात मंगळवारी कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा याच्यासह सहा नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला होता. तसेच या राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पोलिस कारवाईमध्ये सीपीआय (माओवादी) संघटनेच्या ५० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.

विजयवाडा येथे पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलिस महासंचालक (इंटेलिजन्स) महेशचंद्र लड्डा यांनी सांगितले की,  हिडमाला मंगळवारी जिथे टिपले तेथून सात किमीवर मारेडूमल्ली येथे बुधवारी सकाळी सात वाजता दुसरी चकमक झाली. यात ठार झालेल्या सात जणांमध्ये तीन महिलांसह मेटुरू जोगाराव ऊर्फ ‘टेक शंकर’ याचा समावेश आहे. टेक शंकर हा आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीच्या तांत्रिक शाखेचा प्रमुख होता. त्याने मागील काही वर्षांत छत्तीसगड व आंध्र-ओडिशा भागात लँडमाइन व स्फोटक हल्ल्यांचे डिझाइन आणि अंमलबजावणी केली होती. शस्त्रनिर्मिती, संचार प्रणाली, स्फोटक रचना यात त्याचे विशेष कौशल्य होते. 

छत्तीसगडध्ये सततच्या कारवायांमुळे अनेक नक्षलली आंध्र प्रदेशात पलायन करत आहेत. कृष्णा, एलुरू, एनटीआर, काकीनाडा आणि कोनसीमा जिल्ह्यांमध्ये तसेच विजयवाडा शहरातून पोलिसांनी ५० नक्षलींना अटक केली. शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी ३९ शस्त्रे, ३०२ जिवंत काडतुसे, डिटोनेटर, १३ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. 

पोलिस अधिकारी शहीद 
छत्तीसगड–मध्य प्रदेश सीमेजवळ कांगुर्रा येथील जंगलात नक्षलवाद्यांसोबत बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत मध्य प्रदेशातील एक पोलिस अधिकारी शहीद झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Andhra Pradesh: Seven Naxalites Killed, 50 Arrested, Arms Seized

Web Summary : Andhra Pradesh police killed seven Naxalites in an encounter, following a previous operation that killed six. Fifty Naxalites were arrested across five districts. Police seized weapons, ammunition, detonators, and cash during the operation. A police officer was killed in Chhattisgarh near the border.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशnaxaliteनक्षलवादी