दिल्लीत पंख्यांच्या कारखान्यात स्फोट, सात जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 02:27 AM2019-01-04T02:27:45+5:302019-01-04T02:27:56+5:30

दिल्लीतील मोतीनगर परिसरातील सुदर्शन पार्कमध्ये गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. सुदर्शन पार्कमधील एका पंख्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्यामुळे कारखान्याची इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. 

7 killed as explosion triggers building collapse in West Delhi's Moti Nagar | दिल्लीत पंख्यांच्या कारखान्यात स्फोट, सात जणांचा मृत्यू 

दिल्लीत पंख्यांच्या कारखान्यात स्फोट, सात जणांचा मृत्यू 

Next

नवी दिल्ली : दिल्लीतील मोतीनगर परिसरातील सुदर्शन पार्कमध्ये गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. सुदर्शन पार्कमधील एका पंख्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्यामुळे कारखान्याची इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. 

गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास या कारखान्याच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याच्या इमारतीचे दोन मजले कोसळले. यावेळी दोन्ही मजल्यावर 10 ते 12 जण उपस्थित होते. 


दरम्यान, या स्फोटानंतर लगेच घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. मात्र, आणखी काही जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



 

Web Title: 7 killed as explosion triggers building collapse in West Delhi's Moti Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.