शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

पाच मुली झाल्या, पण 'विकास' जन्मलाच नाही; काँग्रेस नेत्याच्या ट्विटनं वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 2:13 PM

काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या ट्विटमुळे वाद; स्पष्टीकरण देण्याची वेळ

भोपाळ: पंतप्रधान मोदींनी घेतलेले निर्णय आणि त्यांनी आणलेल्या योजनांची तुलना मुलींच्या जन्माशी करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'विकास' जन्माला यावा म्हणून मोदींनी इतर योजना आणि निर्णय देशावर लादले, असं मध्य प्रदेशचे माजी मंत्री जितू पटवारी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'मोदींनी नोटबंदी, जीएसटी, महागाई, बेरोजगारी आणि मंदी आणून देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली. विकासाची आशा बाळगून जनता हे सगळं सहन करत होती,' असं म्हणत पटवारी यांनी मोदींवर निशाणा साधला. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार असताना पटवारी शिक्षण मंत्री होते. याशिवाय सध्या ते पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आहेत. मध्य प्रदेशच्या विधानसभेत ते राऊ मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ सबका विश्वास' घोषणा दिली होती. त्यावरून पटवारींनी मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती करताना मुलगा आणि मुलीच्या जन्माची तुलना केल्यानं पटवारी वादात सापडले. यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'मुली या देवीसारख्या आहेत. आमच्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो,' असं पटवारी यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस