शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

४९ दिवसांनी जम्मूत सरकार

By admin | Published: March 01, 2015 11:49 PM

जम्मू-काश्मीरच्या राजकीय इतिहासात रविवारी प्रथमच भारतीय जनता पक्ष व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे सरकार अस्तित्वात आले़ पीडीपीचे

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजकीय इतिहासात रविवारी प्रथमच भारतीय जनता पक्ष व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे सरकार अस्तित्वात आले़ पीडीपीचे संरक्षक मुफ्ती मोहंमद सईद यांनी १२ वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली़ भाजपचे डॉ़ निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली़ याचसोबत राज्यातील ४९ दिवसांची राज्यपाल राजवट संपुष्टात आली.जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न होते़ आज ते पूर्ण झाले़ पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्वप्नपूर्तीच्या आनंदाचे साक्षीदार ठरले़ त्यांच्यासह भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पक्षाध्यक्ष अमित शहा व सरचिटणीस राम माधव आदींची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती होती़ जम्मू विद्यापीठाच्या जनरल जोरावर सिंह सभागृहात पीडीपी-भाजप आघाडी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला़ यावेळी पीडीपीच्या १३ आणि भाजपच्या ११ मंत्र्यांनी शपथ घेतली़ यात १६ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्री आहेत़ नव्या मंत्रिमंडळात भाजपच्या प्रिया सेठी आणि पीडीपीच्या आसिया नकाश या दोन महिलांची वर्णी लागली़भाजप बॅकफूटवरशपथविधी सोहळ्यानंतर सईद आणि निर्मलसिंह यांनी १६ पानांचा ‘अजेंडा आॅफ दल अलायन्स’ जारी केला़ आपल्या राष्ट्रीय अजेंड्यात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन देणारी भाजप यानिमित्ताने बॅकफूटवर आलेली दिसली़ कलम ३७० वर यथास्थिती कायम ठेवण्यावर भाजपने ‘अजेंडा आॅफ दल अलायन्स’मध्ये सहमती दर्शविली़ सज्जाद गनी लोण यांचीही वर्णीजम्मू-काश्मीरमधील माजी फुटीरवादी नेते व पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद गनी लोण यांचीही पीडीपी- भाजप आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली़ (वृत्तसंस्था)