शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ३६ चौक मृत्यूचे सापळे

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

शहरातील ३६ चौक मृत्यूचे सापळे

शहरातील ३६ चौक मृत्यूचे सापळे
-वाहतूक शाखांकडे अपघात स्थळांची नोंद : मात्र उपाययोजनांकडे दुर्लक्ष
-लोकमत स्पेशल
(चौकातील फोटो रॅपमध्ये आहे)
सुमेध वाघमारे
नागपूर : आधीच अरु ंद चौक, त्यात अनधिकृत व्यावसायिकांनी व्यापलेला फुटपाथ आणि रस्त्याच्या दुर्तफा पार्किंगमुळे शहरातील ३६ चौक अपघाती मृत्यूचे सापळे ठरले आहे. विशेष म्हणजे याची नोंद संबंधित वाहतूक शाखेकडेही आहे, परंतु चौकात अपघात रोखण्याच्या काहीच उपाययोजना अथवा दिशादर्शक सूचनांचे साधे फलकही दर्शविण्यात आले नसल्याचे वास्तव आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षात १ हजार १५१ अपघात झाले असून यात २८१ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या ६ हजार २५५ अपघातात १हजार ४३३ जणांचा मृत्यू झाला आहेत. शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही वाहतूक प्रशासनाचे याकडे विशेष लक्ष नसल्याचे चित्र आहे.
-अपघात चौक म्हणून नोंद असतानाही पोलीस नाही
गेल्यावर्षी पश्चिम, उत्तर, दक्षिण, इंदोरा व एमआयडीसी वाहतूक शाखेच्या तुलनेत पूर्व वाहतूक शाखेंतर्गत सर्वात जास्त म्हणजे १३८७ अपघात झाले आहेत. या शाखेंतर्गंत मेडिकल चौक ते अजनी रेल्वे ब्रिज, म्हळगीनगर चौक, बेसा चौक ते चामट चक्की चौक, रामेश्वरी ते शताब्दीनगर आदी अपघाताचे स्थळ म्हणून नोंद आहे. परंतु या मार्गावर वाहतुकीच्या दिशानिर्देशांचे कुठेही फलक नाही. महत्त्वाचे म्हणजे, मेडिकल चौक ते अजनी रेल्वे ब्रिज चौक मार्गावर एकाही वाहतूक पोलिसाची ड्युटी लावली जात नाही. अशीच स्थिती इतरही शाखेच्या अपघात स्थळांच्या चौकातील आहे.