चेतन फौंड्रीच्या मालकांनी भरले 3़55 लाख लोकमत इफेक्ट: शहा यांना अटक करण्याचा आदेश अखेर रद्द

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:39+5:302015-09-07T23:27:39+5:30

सोलापूर:

3,555 lakhs Lokmat effect filled with Chetan fondry owners: Shah ordered to cancel | चेतन फौंड्रीच्या मालकांनी भरले 3़55 लाख लोकमत इफेक्ट: शहा यांना अटक करण्याचा आदेश अखेर रद्द

चेतन फौंड्रीच्या मालकांनी भरले 3़55 लाख लोकमत इफेक्ट: शहा यांना अटक करण्याचा आदेश अखेर रद्द

लापूर:
कामगाराला देण्याची साडेतीन लाखांची रक्कम चेतन फौंड्रीचे मालक विमलकुमार शहा आणि चेतन शहा यांनी कामगार न्यायालयात भरल्यामुळे त्यांना अटक करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आह़े गेल्या सहा वर्षांपासून शहा कुटुंबीयांचा, त्यांच्या बसचा शोध लागत नव्हता़ ‘लोकमत’च्या बातमीमुळे हे पैसे वसूल झाले आहेत़
अब्दुल सत्तार शेख (रा़ विजापूर नाका) या कामगाराची साडेतीन लाखांची रक्कम देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने चेतन फौंड्रीला 2009 साली दिला़ जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसुलीची (आरआरसी) कारवाई उत्तर सोलापूर तहसीलदारांनी सुरू केली़ कोणतीही मालमत्ता शहा यांच्या नावे सापडली नाही़ एक बस सापडली़ आरटीओकडून तिची तपासणी आणि मूल्यांकन केले; मात्र दोन वर्षांनंतर ही बस गायब झाली होती़ कामगाराला देण्याची ही रक्कम वसूल करण्यासाठी विमलकुमार शहा आणि चेतन शहा यांना अटक करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत़ त्यामुळे कामगाराला देण्याची रक्कम 1 लाख 43 हजार आणि त्यावरील रक्कम अदा करेपर्यंत 12 टक्के दराने व्याज अशा पद्धतीने शेख यांना देण्यासाठी 3 लाख 50 हजार वसूल करण्याचा आदेश दिला़ जमीन महसूल थकबाकीप्रमाणे वसुली (आरआरसी) प्रमाणपत्रामध्ये जंगम मालमत्ता जप्तीचा आदेश उत्तर तहसीलदारांनी 2010 साली दिला होता़ त्यावेळीपासून हे प्रकरण सुरू होत़े अखेर ‘लोकमत’च्या बातमीमुळे हे प्रकरण निकाली निघाले आह़े
कोट़़़
कामगारास द्यावयाची साडेतीन लाखांची रक्कम वसूल होत नसल्यामुळे विमलकुमार शहा आणि चेतन शहा यांना दिवाणी तुरुंगात ठेवण्यासाठी अटक करण्याबाबतचे विजापूर नाका पोलीस निरीक्षकांना पत्र दिले होत़े ‘लोकमत’च्या वृत्तानंतर ही रक्कम कामगार न्यायालयात जमा केल्यामुळे शहा यांना अटक करु नये, असे पत्र पुन्हा पोलिसांना दिले आह़े
हणमंत कोळेकर
तहसीलदार, उत्तर सोलापूर

Web Title: 3,555 lakhs Lokmat effect filled with Chetan fondry owners: Shah ordered to cancel