Free Electricity: भगवंत मान यांनी शब्द पाळला; पंजाबच्या जनतेला मिळणार दरमहा मोफत 300 यूनिट वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:55 PM2022-07-01T16:55:51+5:302022-07-01T16:57:50+5:30

Free Electricity: पंजाबमधील आप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे, त्यानुसार आजपासून राज्यात 300 युनिट वीज फ्री असेल.

300 Units of Free Electricity in Punjab: Bhagwant Mann fulfill his promise; people of Punjab will get 300 units of free electricity every month | Free Electricity: भगवंत मान यांनी शब्द पाळला; पंजाबच्या जनतेला मिळणार दरमहा मोफत 300 यूनिट वीज

Free Electricity: भगवंत मान यांनी शब्द पाळला; पंजाबच्या जनतेला मिळणार दरमहा मोफत 300 यूनिट वीज

Next

Punjab AAP : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी निवडणुकीपूर्वी पंजाबच्या जनतेला दिलेला शब्द पाळला आहे. आज(दि.1 जुलै)पासून राज्यातील प्रत्येक घराला 300 युनिट वीज मोफत(300 Units of Free Electricity) देण्याची घोषणा मान यांनी केली आहे. स्वतः भगवंत मान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे पंजाबच्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

आपकडून वचनपूर्ती
मान यांनी ट्विट केले की, "आधीची सरकारे निवडणुकीच्या वेळी आश्वासने देत होती, आश्वासने पूर्ण होईपर्यंत 5 वर्षे निघून जायची. परंतु आमच्या सरकारने पंजाबच्या इतिहासात एक नवीन उदाहरण ठेवले आहे. आज आम्ही पंजाबच्या जनतेला दिलेले आणखी एक वचन पूर्ण करत आहोत. आजपासून पंजाबमधील प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.

देशातील दुसरे राज्य
2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान AAP ने दिलेल्या आश्वासनांपैकी एक म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज पुरवणे. आप नेते आणि राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा म्हणाले की, लोकांना मोफत वीज पुरवणारे पंजाब हे दिल्लीनंतर दुसरे राज्य बनले आहे.

Web Title: 300 Units of Free Electricity in Punjab: Bhagwant Mann fulfill his promise; people of Punjab will get 300 units of free electricity every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.