2जी घोटाळा : उच्च न्यायालयात निर्णय पलटण्याची स्वामींना आशा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 06:40 PM2017-12-21T18:40:37+5:302017-12-21T19:25:18+5:30

2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणात आज आलेल्या निकालामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारने निकालाविरोधात उच्च न्यायलात दाद मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी दिली आहे. 

2G scam: Subramanium Swamy hope to change the decision in High Court | 2जी घोटाळा : उच्च न्यायालयात निर्णय पलटण्याची स्वामींना आशा 

2जी घोटाळा : उच्च न्यायालयात निर्णय पलटण्याची स्वामींना आशा 

googlenewsNext

नवी दिल्ली - 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणात आज आलेल्या निकालामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी 2जी घोटाळा प्रकरणात जोरदार आघाडी उघडली होती. आता निकालानंतर आपण न्यायालयाच्या निर्णयामुळे निराश झालेलो नाही. सरकारने निकालाविरोधात उच्च न्यायलात दाद मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी दिली आहे. 
न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसलेल्या स्वामी यांनी सीबीआयवर तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. तसेच या अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याबाबतही प्रश्न उपस्थित केले. मात्र या निर्णयानंरही भ्रष्टाचाराविरोधातील आपली लढाई सुरू राहणार असून, आजपासून भ्रष्टाचाराविरोधात युद्धस्तरावर लढण्याचा निर्णय झाला पाहिजे, त्यासाठी मी स्वत: पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे, असे त्यांनी सांगितले. 
यावेळी स्वामी यांनी जयललिता यांच्या भ्रष्टाचाराच्या खटल्याचेही उदाहरण देत आपला विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "या निर्णयाविरोधात सरकारने उच्च न्यायालयात दाद मागितली पाहिजे. जयललिता यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही असाच निर्णय आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय पलटवून लावत जयललिता यांना दोषी ठरवले होते." आपण या खटस्याचे निकालपत्र अद्याप वाचलेले नाही. ते वाचल्यानंतर याप्रकरणातील पुढील भूमिका आपण ठरवू असेही त्यांनी सांगितले.  

संपूर्ण देशाला हादरवणा-या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा, डीएमके नेत्या व खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना आज दोषमुक्त केले. सीबीआयची दोन प्रकरण व  अंमलबजावणी संचालनालयाच्या एका प्रकरणावर गुरुवारी (21 डिसेंबर) सुनावणी झाली.  1 लाख 76 हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात तत्कालीन यूपीए सरकारमधील दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यासह अनेक आरोपी होते.  

 

Web Title: 2G scam: Subramanium Swamy hope to change the decision in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.