27 countries unite against China, open front against dragons | चीनला अद्दल घडवण्यासाठी २७ देशांची एकजूट, ड्रॅगनविरोधात उघडली आघाडी

चीनला अद्दल घडवण्यासाठी २७ देशांची एकजूट, ड्रॅगनविरोधात उघडली आघाडी

ठळक मुद्देमनमानी पद्धतीने नजरबंदी, व्यापक टेहेळणी, निर्बंध, उईगरांविरोधात अत्याचार आणि चीनमधील अल्पसंख्याकांच्या अवस्थेबाबत व्यक्त केली चिंता मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा हवाला देत चीनने हल्लीच संमत केलेल्या हाँगकाँग सुरक्षा कायद्याचा मुद्दा उपस्थित सर्वत्र दंडेलशाही करणाऱ्या चीनविरोधात जगातील २७ देशांनी मोर्चा उघडला

वॉशिंग्टन - भारत आणि चीनमध्ये सध्या लडाख खोऱ्यात कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान, गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर देशात निर्माण झालेल्या चीनविरोधी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने परवा ५९ चिनी अॅपवर कारवाई करून चीनला इशारा दिला आहेत. त्यातच आता सर्वत्र दंडेलशाही करणाऱ्या चीनविरोधात जगातील २७ देशांनी मोर्चा उघडला आहे. या २७ देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाकडे (यूएनएचआरसी) चीनविरोधात तक्रार याचिका दाखल केली आहे.

मनमानी पद्धतीने नजरबंदी, व्यापक टेहेळणी, निर्बंध, उईगरांविरोधात अत्याचार आणि चीनमधील अल्पसंख्याकांच्या अवस्थेबाबत या याचिकेमधून चिंता व्यक्त केली आहे. या याचिकेमध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा हवाला देत चीनने हल्लीच संमत केलेल्या हाँगकाँग सुरक्षा कायद्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच हा कायदा चीन आणि हाँगकाँगमील एक देश दोन प्रणालीच्या विरुद्ध आहे, असे म्हटले आहे.  

यूएनएचआरसीमध्ये चीनविरोधात एकत्र आलेल्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बेलीज, कॅनडा, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, आइसलँड, जर्मनी, जपान, लाटव्हिया, लिकटेंस्टिन, लिखुआनिया, लक्झेम्बर्ग, मार्शल आइसलँड्स, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पलाऊ, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्वीडन, स्वीत्झर्लंड आणि युनायटेड किंग्डम या देशांचा समावेश आहे. 

 झिजियांग आणि हाँगकाँगपर्यंत पोहोचण्यासाठी चीनकडून परवानगी मिळवून देण्यात यावी, जेणेकरून आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार मिळणारे अधिकार आणि स्वतंत्रतेचे रक्षण करता येईल, अशी विनंती या याचिकेमधून संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांकडे करण्यात आली आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ज्या वस्तूसाठी होता चीनवर 'निर्भर', त्याच्याच निर्मितीत भारत बनला 'आत्मनिर्भर', आता करणार निर्यात

हातात घेऊन कृपाण, गलवानमध्ये बारा चिन्यांचे केले शिरकाण; २३ वर्षांच्या जवानाचा महापराक्रम

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

Read in English

English summary :
27 countries unite against China, open front against dragons

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 27 countries unite against China, open front against dragons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.