शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२५० अतिरेकी काश्मीर खोऱ्यात सक्रिय

By admin | Updated: October 10, 2016 23:21 IST

पाकिस्तानस्थित तीन दहशतवादी संघटनांचे २५० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात सक्रिय

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तानस्थित तीन दहशतवादी संघटनांचे २५० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात सक्रिय असून, पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाला लक्ष्य करण्याचा त्यांचा डाव आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन या तीन पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे २५० दहशतवादी २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्रीच (सर्जिकल स्ट्राईकच्या आधी) घुसले आहेत.भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये (लक्ष्यनिर्धारित कारवाई) या तीन दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाले आहे. काश्मीर खोऱ्यात घुसलेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या म्होरक्यांनी काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलावर निशाणा साधण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सुरक्षा दलाला सतर्क राहून या दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सर्वप्रकारे खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षाही आणखी आवळण्यात आलेली आहे. कारण या भागातील कठीण भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी फटी आहेत. सीमेपलीकडून नव्याने होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दल खबरदारीसह सज्ज आहे, असे सूत्रांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमधील विविध छुप्या मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा बेत आहे, अशी गुप्तचर विभागाची माहिती आहे.