शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

नौदलाच्या २५ हजार कोटींच्या निविदा खाजगी क्षेत्रासाठीच

By admin | Updated: September 15, 2014 04:35 IST

खाजगी क्षेत्राची जहाज बांधणीची क्षमता वाढावी म्हणून संरक्षण मंत्रालयाने नौदलासाठी चार युद्धनौका बांधणीच्या २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पात सहभागी होण्याची एका सरकारी शिपयार्डची विनंती फेटाळली

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्राची जहाज बांधणीची क्षमता वाढावी म्हणून संरक्षण मंत्रालयाने नौदलासाठी चार युद्धनौका बांधणीच्या २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पात सहभागी होण्याची एका सरकारी शिपयार्डची विनंती फेटाळली आणि खाजगी कंपन्यांचा मार्ग मोकळा केला.या प्रकल्पांतर्गंत जमिनीवर आणि पाण्यावर काम करण्याची क्षमता असणाऱ्या चार युद्धनौका बांधण्यात येणार आहे. पीपापाव, एबीजी आणि एल अ‍ॅण्ड टी यासह केवळ खाजगी क्षेत्रातील शिपयार्डंना आपल्या परदेशी भागीदारासोबत चार लँडिंग प्लॅटफार्म डॉक्स बनविण्यासाठी २५ कोटी रुपयाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची परवानगी देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. गेल्या वर्षी नौदलाने या तीन शिपयार्डंना निविदा जारी केली होती आणि कोचीन शिपयार्ड लि. ला बाहेर केले होते. ४० हजार टन वजनाचे स्वदेशी विमानवाहक जहाजाची बांधणी करीत आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे, असे सांगून कोचीन शिपयार्डला या प्रकल्पात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, सीएसएलने जहाजबांधणी मंत्रालयाच्या माध्यमातून माजी संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅन्टोनी यांच्याशी संपर्क साधला होता. यामुळे निविदा परत घेण्यात यायला हवी की, सीएसएललादेखील निविदा जारी करायला पाहिजे यावर विचार करण्यासाठी करार थांबवण्यात आला. या प्रकरणावर विचार करण्यासाठी एक अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. (वृत्तसंस्था)