Coronavirus: दिल्लीत निजामुद्दीन भागातील २०० लोकांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 02:45 AM2020-03-31T02:45:22+5:302020-03-31T06:26:36+5:30

चिंतेतील केंद्राला हवेय विदेशांतून आलेल्या सर्वांचे क्वारंटाईन

200 people in Nizamuddin area to be inspected in Delhi | Coronavirus: दिल्लीत निजामुद्दीन भागातील २०० लोकांची होणार तपासणी

Coronavirus: दिल्लीत निजामुद्दीन भागातील २०० लोकांची होणार तपासणी

googlenewsNext

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागातील धार्मिक इमारतीत मलेशिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया आणि किर्गिस्तान आदी देशांतील शेकडो लोक राहत असल्यामुळे दिल्लीतील २०० पेक्षा जास्त लोकांना कोविड-१९ च्या चाचणीसाठी वेगवेगळ््या रुग्णालयांत नेण्यात आले.

एकाचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला तर इतर १० जण कोरोना विषाणूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यामुळे प्रशासन आणि पोलिसांना ती संपूर्ण इमारत ताब्यात घेऊन तेथे संरक्षक साखळी निर्माण करणे भाग पडले आहे. मार्च महिन्याच्या मध्यात निजामुद्दीन भागातील अलामी मर्कझ बंगलेवाली येथे तबलिघी जमातच्या धर्मोपदेशकांना ऐकण्यासाठी शेकडो लोक जमले होते.

श्रीनगरमध्ये मरण पावलेली व्यक्ती आणि हैदराबादेत चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेले ११ इंडोनेशियन यांच्यात समान बाब आढळल्यानंतर अधिकारी धार्मिक स्थळ संकुलाकडे वळले. जेव्हा धोक्याची घंटा वाजली तेव्हा प्रशासनाने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विदेशांतून आलेल्यांशी संपर्क साधणे व त्यांचा शोध घ्यायला सुरवात केल्यावर त्याला हे आढळले की १४ दिवसांच्या क्वारंटाईनचे त्यांच्याकडून पालन केले गेले नाही. हे लोक विदेशांतून विमानतळावर आल्यावर त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला गेला होता.

मशिदीत १२०० लोक उपस्थित होते. ही मशीद दिल्लीत तबलिघी जमातचे केंद्र आहे. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर दुसऱ्या दिवशी व देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याच्या आधी पोलिसांनी त्यांना विमानतळावर संरक्षण दिले होते. परंतु, ते परत आले आणि फार मोठ्या प्रमाणावर बाधा होण्याची भीती व्यक्त झाल्याचे वृत्त आल्यावर पोलिसांनी कारवाई सुरू करताच तेथे सुमारे दोन हजार जण अजूनही संकुलात आहेत. हे लोक सहा मजली डॉर्मिटरीत वास्तव्यास असून त्यातील २८० जण विदेशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीत मरण पावलेली व्यक्ती कोरोना विषाणूबाधित होती हे सिद्ध झालेले नाही.

कार्यक्रमास हजर तेलंगणातील ६ जणांचा मृत्यू

हैदराबाद : दिल्लीत निजामुद्दीन भागात १३ ते १५ मार्च या काळात झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमास हजेरी लावलेल्या तेलंगणातील ६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती तेलंगणा सरकारने दिली आहे. दिल्लीतील या कार्यक्रमास तेलंगणातील लोक गेले होते. या सहा जणांपैकी दोन जणांचा गांधी हॉस्पिटलमध्ये, दोन जणांचा खासगी रुग्णालयात एकाचा निझामाबादमध्ये आणि गडवाल शहरात मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. यात या लोकांच्या मृत्यूची वेळ देण्यात आली नाही.

Web Title: 200 people in Nizamuddin area to be inspected in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.