शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

२०... सावनेर... रेती

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

रेतीचोरट्यांवर दंडात्मक कारवाई

रेतीचोरट्यांवर दंडात्मक कारवाई
२३६ प्रकरणे : १० लाख ७४ हजारांचा दंड वसूल
सावनेर : तालुक्यातील विविध रेतीघाटांमधून रेतीची चोरी केली जात आहे. महसूल विभागाने एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या आर्थिक वर्षांत रेतीचोरीची एकूण २३६ प्रकरणे नोंदविली. यातून १० लाख ७४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.
तालुक्यात सुरू असलेल्या रेतीचोरीला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, रेतीतस्कारांना लगाम घालण्यात महसूल विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांना फारसे यश आले नाही. तालुक्यात रेतीतस्करांवर कारवाई केली जात आहे. मात्र ती तोकडी पडत असल्याचे दिसून येते. महसूल विभागाने एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या आर्थिक वर्षांत रेतीतस्करांविरुद्ध मोहीम उघडली होती. यात एकूण २३६ प्रकरणांची नोंद करून एकूण १० लाख ७४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.
एप्रिल २०१४ ते ऑक्टोबर २०१४ या सहा महिन्यांत रेतीचोरीची एकूण २५२ प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यातून १४ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १८ नोव्हेंबरपर्यंत यात १९ प्रकरणांची भर पडली. या १९ प्रकरणांमधून ८९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती महसूल कर्मचाऱ्यांनी दिली. एवढे असूनही तालुक्यातील रेतीचोरीला आळा घालण्यात तहसील कार्यालयाला यश आले नाही. तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचे रेतीतस्करांशी आर्थिक लागेबांधे असल्याने तसेच रेतीतस्कारांना राजकीय वरदहस्त असल्याने रेतीचोरीला कायमस्वरूपी आळा घालणे शक्य होत नसल्याचे जाणकारांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
***