कोलकात्यात दुर्गा देवीला दोन तोळ्यांचा मास्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 01:33 PM2021-08-09T13:33:47+5:302021-08-09T13:34:00+5:30

कोलकात्यामध्ये एका दुर्गा देवीच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी देवीच्या मूर्तीला चक्क दोन तोळे सोन्याचा मास्क घालण्यात आला आहे.

20 gm gold mask for goddess durga devi in kolkata | कोलकात्यात दुर्गा देवीला दोन तोळ्यांचा मास्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

कोलकात्यात दुर्गा देवीला दोन तोळ्यांचा मास्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Next

कोलकाता: कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यापासून अनेक गोष्टींमध्ये अमुलाग्र बदल झालेला पाहायला मिळाला आहे. तसेच अनेक गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचे दिसत आहे. मास्क, सॅनिटायझर या यापैकी काही गोष्टी आहेत. देशभरात चातुर्मासाला सुरुवात झाली आहे. यातच कोलकात्यामध्ये एका दुर्गा देवीच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी देवीच्या मूर्तीला चक्क दोन तोळे सोन्याचा मास्क घालण्यात आला आहे. (20 gm gold mask for goddess durga devi in kolkata)  

दुर्गा देवीचा २० तोळ्याचा मास्क लावलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर दुर्गा देवीच्या हातांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत. या मूर्तीचे काम सध्या सुरु असून, रविवारी फक्त तिची एक झलक दाखवण्यात आली. मात्र ही मूर्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील”; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा

सोन्याचा मास्क हा खूप मोठा दागिना म्हणून पाहू नका

दुर्गा देवीच्या हातामध्ये मास्क, थर्मल गन तसेच इतर गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. या माध्यमातून लोकांना सुरक्षित राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. कोरोनाच्या या संकटात आरोग्य आणि सुरक्षा किती महत्वाची आहे यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. सोन्याचा मास्क हा खूप मोठा दागिना म्हणून पाहू नका, असे आवाहन तृणमूलच्या आमदार आणि बंगाली गायक अदिती मुनशी यांनी केले आहे.

“सगळं केंद्रानं करावं, द्यावं; मी फक्त घरात बसणार आणि ठेकेदारांची बिलं काढणार”

दरम्यान, पश्चिम बंगालमधील प्रत्येक मुलगी ही गोल्डन गर्ल असून प्रत्येक पालक आपल्या मुलीला सोन्याने मढवू इच्छित आहे, अशी यामागे कल्पना आहे. आम्ही उगीचच दोन तोळ्याचे मास्क लावलेले नाही. आम्ही करोनाच्या काळात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा इच्छेने हे केले आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच गतवर्षी कोरोना संकटामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने नवरात्रीला पूजा मंडपात उपस्थित न राहण्यासंबंधी आदेश दिले होते. मात्र, यावर्षी लोक पुन्हा एकदा नवरात्री साजरी करण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत.


 

Web Title: 20 gm gold mask for goddess durga devi in kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app