“सगळं केंद्रानं करावं, द्यावं; मी फक्त घरात बसणार आणि ठेकेदारांची बिलं काढणार”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 11:20 AM2021-08-09T11:20:21+5:302021-08-09T11:21:32+5:30

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत, हेच धोरण असल्याचे म्हटले आहे.

bjp keshav upadhye criticised cm uddhav thackeray over facebook live | “सगळं केंद्रानं करावं, द्यावं; मी फक्त घरात बसणार आणि ठेकेदारांची बिलं काढणार”

“सगळं केंद्रानं करावं, द्यावं; मी फक्त घरात बसणार आणि ठेकेदारांची बिलं काढणार”

Next

मुंबई: मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC परीक्षा आणि नियुक्त्या, कोरोनाचे निर्बंध अशा अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावरून आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत, हेच धोरण असल्याचे म्हटले आहे. (bjp keshav upadhye criticised cm uddhav thackeray over facebook live)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक दिवसांनंतर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवेशाची मुभा देण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फेसबुक लाइव्हवरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. 

“सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील”; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा

हेच धोरण  

सगळे केंद्राने करावे आणि केंद्राने द्यावे मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार आणि सरकारमधून ठेकेदारांची बिले काढणार- हेच धोरण, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये, भाजपाच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लसीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही?, असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला.  

तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले

सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर!, असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

दरम्यान, कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.  केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले.   
 

Web Title: bjp keshav upadhye criticised cm uddhav thackeray over facebook live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.