पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 08:36 AM2021-08-09T08:36:17+5:302021-08-09T08:37:54+5:30

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील एक सिद्धिविनायक मंदिराला लक्ष्य करून तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता बांगलादेशात अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

bangladesh radical attacks and destroyed hindu god temples loot hindu religious clash | पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देपाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोडया गावांमधील ५७ हून अधिक हिंदू घरांमध्ये घुसून मोठी लूटपोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप

ढाका: काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील एक सिद्धिविनायक मंदिराला लक्ष्य करून तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता बांगलादेशात अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील ६ मंदिरांना कट्टरवाद्यांनी लक्ष्य करून मोठी तोडफोड केली असून, यात सुमारे ५० हून अधिक मूर्त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. (bangladesh radical attacks and destroyed hindu god temples loot hindu religious clash)

मिळालेल्या माहितीनुसार, खुलना जिल्ह्यातील शियाली, मल्लिकापुरा आणि गोवरा या गावात अचानक शेकडो कट्टरपंथी घुसले आणि या परिसरातील ६ हिंदू मंदिरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेत ५० हून अधिक मूर्त्यांचे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर या गावांमधील ५७ हून अधिक हिंदू घरांमध्ये घुसून मोठी लूट केल्याचे सांगितले जात आहे. या भागातील दुकानेही लुटून नेली असून, या घटनेत ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तान हवाई दलाची मोठी कारवाई; २०० हून अधिक तालिबानी दहशतवादी ठार 

वादाचे नेमके कारण काय? 

मीडिया रिपोर्टनुसार, ६ ऑगस्ट २०२१ रोजी हा वाद सुरू झाला. शुक्रवारी नमाज पठणावेळी कीर्तन करण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र, या दोन गटातील तणाव दंगलीचे स्वरुप धारण करेल, असे कोणालाही वाटले नव्हते, असे म्हटले जात असून, या घटनेला स्थानिक पातळी तसेच आकाशवाणीने दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे. 

विश्व हिंदू परिषदेने घेतली दखल 

विशेष बाब म्हणजे बांगलादेशमधील स्थानिक मीडियामध्ये याबाबत उल्लेखही करण्यात आला नाही. तसेच पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करत स्थानिक हिंदू संघटनांनी या घटनेची निंदा केली आहे. दुसरीकडे भारतातील विश्व हिंदू परिषदेकडून या घटनेची दखल घेत आंतरराष्ट्रीय संघटनांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे.

“मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त”

दरम्यान, पाकिस्तानात पुन्हा एकदा मंदिराला निशाणा बनवण्यात आले आहे. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात बुधवारी काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण असून, स्थानिक पोलिसांनी कारवाई करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच पोलीस या घटनेचा तपासही करत आहेत. 
 

Web Title: bangladesh radical attacks and destroyed hindu god temples loot hindu religious clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.