१९... वाडी... खून

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:05+5:302014-12-19T22:57:05+5:30

दोघांना अटक, एक पसार

19 ... wadi ... blood | १९... वाडी... खून

१९... वाडी... खून

घांना अटक, एक पसार
उमेश इंगळे खूनप्रकरण : क्षुल्लक वादतून केली हत्या
वाडी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दवलामेटी येथील उमेश इंगळे याच्या खून प्रकरणात वाडी पोलिसांनी दोघांना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अटक केली. यातील अन्य एक आरोपी पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उमेश व्यंकटराव इंगळे (२७, रा. आंबेडकरनगर, आठवा मैल) असे मृत तरुणाचे नाव आहे. दिलीप तुकडोदास भैस्वारे (२८, रा. आठवा मैल) व संतोष दिलीप परतेकी (३०, रा. आंबेडकरनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, प्रशांत दिलीप परतेकी (३२, रा. आंबेडकरनगर) असे पसार आरोपीचे नाव आहे. दिलीपची आठवामैल परिसरात पानटपरी आहे तर, उमेश हा मालवाहू मिनिडोअरवर चालक म्हण्ूान काम करायचा. तो चालवीत असलेले टाटा एस वाहन गुरुवारी पासिंग करायला नेल्याने तो रिकामाच होता. त्यामुळे उमेश व तिन्ही आरोपींनी गुरुवारी दिवसभर दिलीपच्या पानटरीचे रंगरंगोटीचे काम केले. सदर काम आटोपल्यानंतर चौघेही मनसोक्त दारू प्यायले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास चौघेही घराकडे जात असताना दिलीपने उमेशसोबत वाद घातला.
वाद विकोपास केल्यान उमेशवर चाकूने वार करून त्याची हत्या केली आणि तिघेही घटनास्थळाहून पळून गेले. दरम्यान, वाडी पोलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यातच वाडी पोलिसांनी आरोपी दिलीपला आठवा मैल परिसरात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तर, संतोषला पांढराबोडी येथील चौकात गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अटक केली. यातील तिसरा आरोपी प्रशांत हा पसार असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर घटनेचा तपास ठाणेदार मुरलीधर करपे, उपनिरीक्षक महादेव पडधान, शंकर शुक्ला, दीपक अवचट, रवींद्र खांडेकर, अजय पाटील, योगेश बहादुरे करीत आहे. (प्रतिनिधी)
***

Web Title: 19 ... wadi ... blood