शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

१८... सारांश

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

टेकाडी येथे दत्तप्रभूंची पालखी यात्रा

टेकाडी येथे दत्तप्रभूंची पालखी यात्रा
पारशिवनी : श्री दत्तप्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्त टेकाडी येथे पालखी यात्रा काढण्यात आली. यात पालोरा, पारशिवनी, तामसवाडी, भागीमहारी, करंभाड, दहेगाव, पारडी, खंडाळा, पिपळा, गवणा, गरांडा येथील भाविक, भजन व दिंडी मंडळ सहभागी झाले होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
***
राखेच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त
पारशिवनी : पारशिवनी-खापरखेडा मार्गावर ठिकठिकाणी वीज केंद्रातील राख पडलेली आहे. वाहनांमुळे ही राख उडत असून, ती राख वाहनचालकांच्या डोळ्यात जात असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील राखेची वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
तुरीवर किडींचा प्रादुर्भाव
पारशिवनी : कडाक्याची थंडी आणि धुक्यांमुळे तुरीचा बहार गळायला सुरुवात झाली असून, किडींचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली आहे. सोबतच कपाशी, फुलकोबी व हरभऱ्याचेही नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
***
कामठीत कौमी एकता फुटबॉल स्पर्धा
कामठी : स्थानिक पोलिसांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कौमी एकता फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, डॉ. आरती सिंह उपस्थित राहणार असून, या स्पर्धेत १४ संघ सहभागी झाले आहेत.
***
मतदानाचा अधिकार देण्याची मागणी
मौदा : विधान परिषदेच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा, स्थानिक विकास निधी १५ लाखांपर्यंत वाढवावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शीला मदनकर, शोभा बागडे, नलिनी पठाळे आदींनी केली असून, राज्यपालांना नुकतेच निवेदन सादर केले आहे.
***
शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन
मौदा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नागपूर शाखेचे वार्षिक अधिवेशन मौद्यातील जनता विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (दि.२१) होणार आहे. यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा केली जाईल. सदर अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***
सार्वजनिक उद्यानाची दैनावस्था
टाकळघाट : नजीकच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील सार्वजनिक उद्यानाची देखभाल व दुरुस्तीअभावी दैनावस्था होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व चिमुकल्यांना फिरण्या व खेळण्यासाठी त्रास होत असल्याने, या उद्यानाची दुरुस्ती करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
***